🌟प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी मार्गदर्शनातून सामाजिक न्यायाचे महत्त्व सांगून छत्रपती शाहू राजेंच्या जीवनावर प्रकाश टाकला🌟
पुर्णा (दि.२६ जुन २०२३) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात राजर्षी शाहू राजे यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार हे होते.
यावेळी सामाजिक न्यायाचे प्रणेते, समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मानवी मूल्यांचा आपल्या राज्यात पहिल्यांदा अमल करणारे थोर राजे छत्रपती राजर्षी शाहू राजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी आपल्या मार्गदर्शनातून सामाजिक न्यायाचे महत्त्व सांगून छत्रपती शाहू राजे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी यांनी छत्रपती शाहू राजे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रभारी प्रा.डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर सूर्यवंशी यांनी केले तर आभार क्रीडा संचालक डॉ.भारत चापके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी महाविद्यालयातील IQAC चे समन्वयक प्रा. डॉ.भीमराव मानकरे, ग्रंथपाल डॉ.विलास काळे, कनिष्ठ महाविद्यालयचे पर्यवेक्षक प्रा. दत्ता पवार, प्रा. सुजाता घन ,प्रा. हुस्ना शेख, श्री. सूर्यकांत भोसले श्री. दत्ता कदम इत्यादी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या