🌟ओडिशा रेल्वे अपघातप्रकरण : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संपर्कप्रमुख म्हणून पवन खांडके यांची नियुक्ती....!


🌟परभणी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन सेवा २४x७ सुरु🌟  

परभणी (दि.०३ जुन २०२३) : ओडिशा राज्यातील रेल्वेच्या तिहेरी अपघातात २०० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून, त्यानुषंगाने जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांची संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागांतर्गत २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  

 श्री. खांडके यांच्या ९९७५०१३७२६ व ७०२०८२५६६८ हा मोबाईल क्रमांक आहे. तसेच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या नियंत्रण कक्षाचा ०२४५२- २२६४०० आणि टोल फ्री क्रमांक १०७७ हा आहे.  

तरी परभणी जिल्ह्यातील नागरिक ओडिशा राज्यात रेल्वे मार्गाने प्रवासासाठी किंवा इतर काही निमित्ताने गेले आहेत मात्र सद्यस्थितीत त्यांचा संपर्क होत नाही, अशा नागरिक किंवा प्रवाशांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्याचे तहसील कार्यालय किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या