🌟पुर्णा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जेष्ठ काँग्रेस नेते डॉ.संजय लोलगे यांचे तिव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन..!


🌟दरम्यान डॉ.संजय लोलगे यांच्या पश्‍चात पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे🌟


परभणी/पुर्णा (दि.१२ जुन २०२३) : परभणी-हिंगोली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते तथा पुर्णा तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ.संजय प्रकाशराव लोलगे यांचे वयाच्या ६० व्या वर्षी आज सोमवारी दि.१२ जुन २०२३ रोजी दुपारी ०४-०० ते ०४-३० वाजेच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुर्णेत दुःखद निधन झाले.


हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या निमित्ताने आज सोमवार दि.१२ जुन रोजी दुपारच्या सुमारास ते घराबाहेर पडले तेव्हा वाहनातच डॉ.संजय लोलगे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सहकार्‍यांनी लगेचच खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकार्‍यांनी डॉ.लोलगे यांना मृत घोषित केले. त्यांच्या या निधनाने कुटूंबियांसह नातेवाईक व मित्र परिवारास मोठा धक्का बसला तर पुर्णेत शोककळा पसरली. डॉ.लोलगे हे पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे तब्बल चार वेळा संचालक होते. तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचेही ते संचालक म्हणून कार्यरत होते. डॉ. लोलगे यांनी पुर्णेत खाजगी समर्थ कृषि उत्पन्न बाजार समितीची उभारणी केली होती. विशेषतः रेशीम उद्योगासाठीही शेतकर्‍यांना बाजारपेठ उपलब्ध केली. डॉ. लोलगे हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. ते तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

         दरम्यान, डॉ.लोलगे यांच्या पश्‍चात पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. हे तीघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या