🌟तेलंगणातच भारत राष्ट्र समितीला (बीआरएसला) मोठे खिंडार....!


🌟अनेक मातब्बर बीआरएस नेत्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश🌟

महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समितीला तेलंगणातच मोठे खिंडार पडले असून, माजी मंत्री जे. कृष्ण राव, माजी खासदार पी. श्रीनिवास रेड्डी, आ.दामोदर रेड्डी यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांनी आज काँग्रेस प्रवेश केला. 

काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खरगे व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सोमवारी २६ जून रोजी दुपारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गुरूनाथ रेड्डी, पाच माजी आमदार तसेच तेलंगणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक प्रमुख नेत्यांनी बीआरएसला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. के. सी. वेणुगोपाल, तेलंगणाचे काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष खा. रेवंत रेड्डी, महाराष्ट्राचे सहप्रभारी माजी आमदार डॉ. संपत कुमार यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या