🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟तेलंगणातील शेतकरी आत्महत्या शुन्यावर ; आता महाराष्ट्राची स्थिती बदलणार - तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

✍️ मोहन चौकेकर

* पतंजली आता क्रीडाक्षेत्रात रामदेव बाबांच्या कंपनीने लाँच केले नवीन 14 प्रोडक्टस.

* बालभारती पुस्तकातून QR कोड वगळला, डिसले गुरुजींच्या चेहऱ्यावर नाराजीचे 'स्कॅनिंग'

* ‘महारेरा’च्या स्थापनेनंतर घरांच्या किमती 5 ते 6 टक्क्यांनी कमी झाल्या, मँचेस्टर विद्यापीठातील अभ्यासकांचा निष्कर्ष.

* आता ‘एसआयटी’ खोदणार बनावट बियाणांची पाळेमुळे; पंधरा सदस्‍यांची नियुक्‍ती.

* आधार-रेशन कार्ड लिंकसाठी मुदत वाढवली; १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. 

* ओलाव्याशिवाय खरिपाच्या पेरण्या नको : कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन.

* जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या 3 शाळांचा डंका, मुंबईतील दोन आणि अहमदनगरमधील एका शाळेचा समावेश.

* ‘नेहरू मेमोरिअल म्युझियम’ ऐवजी आता ‘प्रायमिनिस्टरर्स म्युझिअम’; नामांतरावरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली.

* थर्माकॉलच्या बॉलमध्ये भरून 26 कोटींच्या कोकेनची तस्करी, दिल्लीत गुप्तचर पथकाने विमानतळावर केले जप्त.

* एसटी महामंडळाची तिकीट बुकिंग आता अ‍ॅपवर करता येणार; महामंडळाच्या उपाध्यक्षांची माहिती.

* MBBSच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज : या वर्षी तब्बल तीन हजार ७५० विद्यार्थ्यांना MBBS प्रथम वर्षाला मिळणार प्रवेश.

* कर्नाटक मधील सर्व शाळा-महाविद्यालयांत दररोज संविधानाची प्रस्तावना वाचावी लागणार.

* केंद्र सरकारने दाखविले सर्व पंतप्रधानांचे योगदान; पण माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचे नाव वगळले म्हणून काँग्रेसनी केली केंद्र सरकारवर टीका.

* प्रतीक्षा संपली : सेट परीक्षेचा निकाल २८ जून रोजी.

* नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आदेश न्यायालयाने ठेवला राखून.

* राज्यातील २४ रेल्वे स्थानकांवर 'टीसीं'कडे असणार बॉडी कॅमेरे.

* औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाच्या विरोधात इंदूरीकर महाराज सर्वोच्च न्यायालयात.

* Pune MCA Stadium ला शरद पवार यांचं नाव द्या : धनंजय मुंडेंची मागणी

*आता भारतातुन कारने थेट जाता येणार थायलंड बँकाँकला : भारत-म्यानमार-थायलंड देशांमधून हा हायवे जाणार आहे. येत्या चार वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. थायलंडमधील याचा भाग बांधून तयार असल्याची माहिती थायलंडचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री विजावत यांनी दिली.

* तेलंगणातील शेतकरी आत्महत्या शुन्यावर ; आता महाराष्ट्राची स्थिती बदलणार - तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

* महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या घडतात. शेतकऱ्यांची  परिस्थिती बदलण्यासाठी आमचा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार आहे, असे म्हणत तेलंगणचे  मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी एल्गार पुकारला.

* पुण्यातून चक्क चोराने बसच चोरली : पुण्यातील सारसबाग परिसरातून चक्क PMPLची बस चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. बसला असलेली चावी पाहताच चोराने हा डाव साधला, पुढे मार्केट यार्ड परिसरात ही बस सोडून चोरट्यानं बसमधील बॅटरी लंपास केली आहे. 

* मणिपूर मधील हिंसाचार थांबेना, केन्द्रीय मंत्र्याचं घरं जाळलं : मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिघळली आहे. इंफाळ येथे गुरूवारी (१५ जून) जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री या वेळी घरात नव्हते.

* भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर'मध्ये महिना उलटूनही दंगल थांबेना, हजारो बेघर-शेकडो मृत्युमुखी

* आधार कार्ड नसणाऱ्यांना उपचार नाकारल्यास कारवाई केली जाणार, मुंबई महापालिकेचा आरोग्य अधिकाऱ्यांना इशारा

* बोगस बियाण्यांचे रॅकेट, साठेबाजी,नफेखोरीवर तात्काळ कारवाई करा; कृषिमंत्र्यांचे कृषी आयुक्तांना निर्देश

* काँग्रेसला मत देणं म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे, कर्नाटक सरकारच्या निर्णयावरुन बावनकुळेंचा हल्लाबोल

* महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील प्राध्यापक पात्रता परीक्षा अर्थात सेटचा निकाल 28 जूनला घोषित करण्यात येणार

* साखर कारखाना उभारणीसाठी 25 किलोमीटरची अट शिथिल? शेतकरी कंपन्यांच्या इथेनॉल निर्मितीसाठी धोरण

* आधीचं सरकार घरी होतं, आमचं सरकार लोकांच्या दारी जातंय; विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर

* अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही; राष्ट्रवादीच्या आमदाराची भीमगर्जना

* सोशल मीडियावरील 'फसवी' जाहिरात, 'वर्क फ्रॉम होम'च्या नावाखाली नाशिकच्या महिलेला 18 लाखांचा गंडा

* आदिपुरुष'चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल; पहिल्याच दिवशी केली 100 कोटी रुपयांची कमाई ; 6,200 स्क्रीन्सवर सिनेमा प्रदर्शित! तरुण तरुणींनी चित्रपट पाहण्यासाठी केली गर्दी

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या