🌟शिवसैनिकांना सामाजिक सत्कार्याची जाणीव - शिवसेना नेते खा. संजय राऊत


🌟अंबादास दानवे यांच्या विकास निधीतून रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खा.संजय राऊत यांचे गौरवोद्गार🌟 

संभाजीनगर (दि.०८ जुन २०२३) : सामाजिक कार्याची जाणीव असणाऱ्याच लोकांच्या हातातून अशी सत्कर्याची कामे होत असतात. आणि हे सत्कार्य कित्येक वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून शिवसैनिक करत आहे, इथून पुढेही सुरूच राहील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आपण सर्वजण जपता याचा सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रुग्णावाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी काढले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या सुविधेसाठी देण्यात आलेल्या रक्त संकलन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पार पडला.गोर - गरीब व गरजू रुग्णांना या सुविधेमुळे मोठा फायदा होणार असून ग्रामीण तसेच दुर्बल भागातून येणाऱ्या रुग्णांना रक्तपुरवठा होण्यासाठी मोठी मदत होणार आहेत. याप्रसंगी संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर,विभागीय सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी,राजू राठोड,माजी महापौर नंदकुमार घोडेले, म.आ. जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, घाटी येथे या रुग्णवाहिकेची अत्यंत्त आवश्यकता असल्यामुळे ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामान्य व गरजू जनतेसाठी माझ्याकडून हे कार्य होत असल्याचे मी माझे भाग्य समजतो.येथे मराठवाड्यासह आसपासच्या राज्यातून मोठया प्रमाणावर रुग्ण येतात. त्यामुळे येथे रक्ताची मागणी खूप जास्त असते.या मागणीची कमतरता नेहमीच शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिरच्या उपक्रमातून भरण्याचा प्रयत्न होत असतो. 

याव्यतिरिक्त गरीब व गरजू रुग्णांसाठी लागणाऱ्या रक्ताची वाहतूक करण्यासाठी रक्त संकलन रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याचे घाटी तर्फे मला  कळविण्यात आले होते.त्यानंतर या रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेऊन उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे यावेळी दानवे म्हणाले.

दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे बोलताना म्हणाले की, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला दागिना आहेत. त्यांनी दाखवलेल्या विचारावरतीच शिवसेना काम करत असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा यांनी अशा पद्धतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून   उत्कृष्ट कार्य केले आहे, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे.

तसेच वाढत्या शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे दिवसेंदिवस घाटी येथे मोठ्या प्रमाणात रक्त साठ्याची गरज पडत आहे.त्यासाठी घाटी रुग्णालय विविध उपक्रम राबवते पण आमच्याही काही मर्यादा आहेत. परंतु स्थानिक शिवसेना नेत्यांसह, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नेहमीच आम्हाला सहकार्य करत करतात. यामुळेच आम्ही रुग्णांना वेळेवर सर्व सुविधा उपलब्ध करून देत असल्याचेही यावेळी अधिष्ठाता डॉ.संजय राठोड म्हणाले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर,गणू पांडे,बंडू ओक, आनंद तांदुळवाडीकर बप्पा दळवी ,विधानसभा संघटक राजू वैद्य,गोपाल कुलकर्णी,शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी,विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे,तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड,राजेंद्र दानवे,कृष्णा मेटे, सचिन वाघ, शासकीय महाविद्यालय अभ्यागत समिती सदस्य प्रमोद ठेंगडे,प्रवीण शिंदे, इकबालसिंग गील,नारायण कांनकाटे,नंदू लबडे,रघुनाथ शिंदे,लक्ष्मण बखारिया ,नितीन पवार,सुनील गायकवाड,संजय हरणे,सचिन खैरे, प्रीतेश जैस्वाल,सुरेश कर्डिले, प्रा.संतोष बोर्ड,विनायक देशमुख, राजू वाकोडे, दिग्विजय शेरखाने, मनोज बोरा मामा, बापू कवळे, कल्याण चक्रनारायण, महिला आघाडी उपजिल्हा संघटक दुर्गा भाटी ,सुनंदा खरात तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी)चे

 उप अधिष्ठाता डॉ. मिराज बेग,वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय कल्याणकर, शरीर विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अनिल जोशी, सहयोगी प्राध्यापक डॉ.भारत सोनवणे व डॉ. प्रगती फुलगीरकर आदींची उपस्थिती होती.... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या