🌟केंद्रीय मंत्रालयाद्वारे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्यांसह डीन यांना ईमेलद्वारे पत्र झाले प्राप्त🌟
परभणी (दि.१२ जुन २०२३) : परभणी येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न कायम मार्गी लागण्याचे चिन्ह दिसू लागले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय मान्यतेसह यावर्षी पासूनच्या प्रवेश प्रक्रियेस हिरवा कंदील मिळावा म्हणून आरोग्य संचालनालयाने दाखल केलेल्या दुसर्या अपीलवर केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटूंबकल्याण मंत्रालयाने येत्या १५ जुन २०२३ रोजी नवी दिल्ली येथे सूनावणी आयोजित केली आहे.
आरोग्य आणि कुटूंबकल्याण मंत्रालयाचे अव्वर सचिव चंदनकुमार यांनी आज सोमवार दि.१२ जून २०२३ रोजी ई-मेल व स्पीड पोस्टद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्यांसह डीन यांना देखील या सूनावनीसंदर्भातील पत्र पाठविले असून आपण ०१ जून २०२३ रोजी दाखल केलेल्या दुसर्या अपीलचा संदर्भ लक्षात घेवून १५ जून २०२३ रोजी आपणास सूनावणीची संधी दिली जात असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या निर्माण भवनातील कक्षात सकाळी १०.३० वाजता आपण वैयक्तिकरीत्या किंवा अधिकृत प्रतिनिधींद्वारे उपस्थित रहावे, यावेळी १५ पेक्षा जास्त स्लाईड्स नसणारे पावरपॉइंट प्रेझेन्टेशन सादर करावे, तांत्रीक माहिती, त्रुटींच्या केलेल्या पूर्ततेसह अन्य तपशील अधिकार्यांसमोर सादर करावा, अशा सूचना या ई-मेलद्वारे दिल्या गेल्या आहेत. दरम्यान, या पत्रामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डीनसह प्राचार्य व अन्य वरिष्ठ अधिकारी सूनावणीच्या दृष्टीकोनातून पूर्वतयारीस लागले आहेत.
दरम्यान, परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसह यावर्षीपासूनच्याच प्रवेश प्रक्रियेस हिरवा कंदील मिळावा म्हणून राज्याच्या आरोग्य संचालनालयाने मोठी धडपड करीत नॅशनल मेडिकल कमिशनकडे अपील दाखल केले होते. परंतु ते अपील मुदतीत दाखल केले नाही, असा ठपका ठेवून या नॅशनल मेडिकल कमिशनने अपील फेटाळून लावले होते. अखेर परभणी मेडीकल कॉलेजच्या डीनद्वारे येत्या गुरुवारी ०८ जुन रोजी नवी दिल्लीतील नॅशनल मेडिकल कमीशनकडे दुसरे अपील दाखल करण्यात आले आहे त्यावर संबंधित मंत्रालयाने दखल घेवून सूनावणीसाठी सर्वांना पाचारण केले आहे.....
🌟धन्यवाद साभार : संतोष धारासूरकर सर यांच्या फेसबूक पेजवरून
0 टिप्पण्या