🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजी/माजी सभापतींचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप ?


🌟विद्यमान सभापती बालाजी रुद्रवार यांचे आरोप खरे की खोटे यावर प्रश्नचिन्ह ? 🌟


पुर्णा (दि.२६ जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण परभणी जिल्ह्यातील चर्चेचा विषय ठरली असून नुकतीच २०२३ ची कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे ०९ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ०३ व काँग्रेस पक्षाचे ०६ अशी त्रिशंकू लढत झाली आणि राष्ट्रवादीने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊन भारतीय जनता पार्टीचे बालाजी रुद्रवार सभापती व राष्ट्रवादीचे शिंदे हे उपसभापती झाले पदभार सांभाळून महिनाही झाला नाही तोच नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बालाजी रुद्रवार यांनी गुरुवार दि.२२ जुन २०२३ रोजी ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती येथे  पत्रकार परिषदेचे आयोजन करुन ताडकळस गट क्रमांक ३१२ भुखंडातील शासनाच्या गायरान जमिनी मधील भूखंडावर अतिक्रमण असल्याने महसूल मंत्र्यांनी ही शासकीय जमीन शासनाने ताब्यात घ्यावी असे आदेश जारी केले आहे असे सांगितले, व महसूल मंत्र्यांचा आदेश असल्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती या नात्याने योग्य ती बाजू मांडू जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही याची परिपूर्ण काळजी घेऊ असे ते म्हणाले यावेळी त्यांनी असे नमूद केले की २४३ भुखंड बाजार समितीचे जॉईंट रजिस्टर यांनी तत्कालीन ठराव रद्द केले नियमावली योग्यरित्या पार पाडली नाही, ज्यामुळे शासनाने २४३ भुखंड रद्द केले आहे असे आदेश आमच्यापर्यंत पोहोचले आहे मागील काळात २४३ भूखंड हे अनोळखी नावाने दिलेले आहे असे आरोपही यांनी केले मार्केट कमिटीने त्या भूखंडधारकांना नोटीस सुद्धा दिलेले आहे व मार्केट कमिटीचे आर्थिक परिस्थिती फार खालावली आहे आणि कर्मचाऱ्यांच्या अंदाजे ८० ते ९० महिन्याचे पगारी सुद्धा झालेले नाही असे आम्हाला कामकाज करताना दिसून आले व बाजार समितीच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा नाही बाजार समितीची निवडणूक चालू असताना बाजार समितीच्या खात्यामधून रकमा सेल्फ उचल झालेले आहे असा आरोप विद्यमान सभापती बालाजी रुद्रवार यांनी केला आहे यावेळी पुढे बोलतांना सभापती रुद्रवार असेही म्हणाले की ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ एकच वर्षाचे रेकॉर्ड उपलब्ध आहे मागील रेकॉर्ड या बाजार समितीत उपलब्ध नाही असाही आरोप सभापती यांनी केला आहे,

🌟विद्यमान सभापती बालाजी रुद्रवार यांचे आरोप खरे की खोटे यावर प्रश्नचिन्ह ? :-


परंतु माजी सभापती अजित वरपूडकर यांनी सर्व आरोपाचे खंडन करण्यासाठी काल रविवार दि.२५ जुन २०२३ रोजी परभणी येथील हॉटेल फॉर्च्यून येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले यावेळी ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अजित वरपूडकर म्हणाले की बाजार समितीच्या निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर बदल अपेक्षित होता परंतु केवळ काँग्रेस पक्षाच्या काळातील कृषी उत्पन्न बाजार समितीला राजकीय द्वेषापोटीच बिन बुडाचे आरोप ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर होत आहेत यावेळी अजित वरपूडकर म्हणाले विद्यमान सभापती म्हणतात मार्केट कमिटीची आर्थिक परिस्थिती खलवली आहे सन २०१७ सली देखील बाजार समितीचे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती परंतु अशा परिस्थितीत देखील सर्वांना न्याय देऊन २४३ भूखंड नियमा कुल करण्याचा ठराव घेऊन वरिष्ठ कार्यालयात पाठविला तसेच शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीसाठी सीसीआय केंद्रसह 'ड' ऐवजी 'ब' दर्जा प्राप्त करून २००५ पासून चा कर्मचारी पीएफ भरणा केला तसेच आठवडी बाजारात सुविधा देऊन लाईटची देखील व्यवस्था करून कोरोना काळात वॉटरप्रूफ मंडप उभारून कापूस खरेदी करून ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती ही परभणी जिल्ह्यातील एकमेव बाजारपेठ ठरली असे अनेक विकास कामे केली असून भविष्यात सत्ता मिळाल्यास बाजार समितीचा आर्थिक तुटवडा केवळ तीन महिन्यात भरून काढण्याची गव्हाही दिली,

व तसेच गट क्रमांक ३१२ मधील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण व २४३ भूखंड वाटप केलेले ठराव रद्द केलेल्या प्रकरणी देखील वरिष्ठ कार्यालयात अपील करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी केली होती, परंतु विद्यमान सभापतींनी योग्य बाजू मांडली नसून मंत्रालयात पुनर याचिका दाखल केली असून केवळ वसुलीसाठी निर्णय दिला जात नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला, विद्यमान सभापती म्हणतात की २४३ भूखंड हे अनोळखी नावाने दिले आहे. २४३ भूकंड वाटपापैकी १४४ भूखंड हे माजी सभापती चंद्रकांत रुद्रवार यांच्याच काळात वाटप केले असून अनोळखी भूखंड धारकाचे नावे विद्यमान सभापतींनी आपल्या घरी वडिलांना विचारले तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन विचारण्याची गरज पडणार नाही असाही सल्ला माजी सभापती  यांनी दिला, गायन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीला नोटीस देण्याची सूचना केली होती, परंतु हे प्रकरण महसूल प्रशासनाकडे वर्ग का केला ? असा प्रश्न उपस्थित केला, आपण भूखंड धारकाच्या विरोधात आहे का समर्थांनात आहे ते आधी स्पष्ट करावे,

सहकार क्षेत्राच्या नियमानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत असलेले भूखंड धारकांना सभापती पदावर राहण्याचा अधिकार नाही परंतु सध्या ताडकळस बाजार समितीच्या सभापती पदावर विराजमान असलेले बालाजी चंद्रकांत रुद्रवार यांच्या नावाने भूखंड असून दोन मजली इमारत देखील असून विद्यमान सभापतीं थोडीफार नैतिकता असेल तर सभापती बालाजी रुदवार यांनी तात्काळ राजीनामा देण्याचे आव्हान माजी सभापती अजित वरपूडकर यांनी केले.

 बाजार समिती निवडणुकी काळत खात्यातून पैसे काढण्यात आले आहे व व आज रोजी खात्यामध्ये एकही रुपया नाही असे म्हणतात. निवडणूक काळात झालेल्या, आर्थिक व्यवहार हा तत्कालीन सभापती व सचिव यांच्या स्वाक्षरीने झाला असून तो निवडणूक विषयक खर्च व कर्मचारी पगारासाठी वापरला असून सध्या बाजार समितीचे स्टेट बँकेच्या खात्यात तीन लाख 27 हजार 453 रुपये जमा असून ही एक प्रकारे दिशाभूल करण्यात येत असून यापुढे बिंदुडाचे आरोप केल्यास विधी तज्ञमार्फत कायदेशीर मानहानीची नोटीस बजावण्याचा इशारा देखील माजी सभापती अजित वरपुडकर यांनी दिला.

पुढे बोलताना अजित दादा म्हणाले विद्यमान सभापती म्हणतात की काही वर्षाचा रेकॉर्ड कार्यालयात नाही परंतु त्यांना माहीत असावे की बाजार समितीचे कार्यालयीन कागदपत्रे व इतर रेकॉर्ड जतन करून ठेवण्याची जबाबदारी ही प्रशासकीय अधिकाऱ्याची असून यासाठी कोणताही सभापती जबाबदार राहत नाही.व नवीन इमारत बांधण्याचा ठराव मंजूर केला आहे असे म्हणतात परंतु यासाठी निधी कुठून आणणार याविषयी मात्र सभापती कडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाही .

आणि निवडणुकीत चिन्ह वाटप प्रकरणी निवडणूक अधिकारी नीतीश कुमार बोलेलो यांनी पोलीस ठाण्यात लेखी आदेश देऊनही राज्याचे गृहमंत्री व आमदार भाजपचे असल्यानेच अद्यापही सभापती विरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे लोकशाही जिवंत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला.

पुढे बोलताना अजित वरपुडकर म्हणाले भारतीय जनता पार्टीची विचारसरणी राष्ट्रवादीला कधीच मान्य नव्हती परंतु बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊन एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला ताडकळस राष्ट्रवादीच्या गटाने श्रद्धांजली वाहिली असून एक प्रकारे भाजप विचारसरणी मान्य केल्याने, राष्ट्रवादीच्या विचारसरणीला माननारे व जनतेने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदान करताना विचार करावा असाही टोला दिला.

माजी सभापती पुढे बोलताना म्हणाले आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूखंडधारकासह गायरान प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची गव्हाही दिली. यावेळी संचालक नरहरी रुद्रवार, नंदकिशोर मुंदडा बापूराव अंभोरे यांची उपस्थिती होती....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या