🌟शाब्बास अनिकेत....तुझं यश म्हणजे क्लासेस कल्चरला सणसणीत चपराक होय....!


🌟ऑनलाइन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून नीट मध्ये 632 मार्क्स घेऊन घवघवीत यश संपादन🌟

परभणी (दि.२६ जुन २०२३) परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील केकरजवळा येथील अनिकेत संतोष लाडाने याचे केकर जवळ्या सारख्या सामान्य खेड्यात तुझ संगोपन झालं. वर्ग पहिली ते पाचवीच शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केलस. त्यानंतरच दहावीपर्यंतचे शिक्षण परभणीतील नवोदय विद्यालयात गुणवत्ते सह पूर्ण केलस. त्यानंतर आलेल्या कोरोना संकटात तू अकरावी बारावी अर्धवट पुन्हा नवोदय मध्येच राहून पूर्ण केलस. अकरावी घरी बसून तर बारावी अर्धे ऑनलाइन व अर्धे प्रत्यक्ष वर्गात . त्यानंतर तू पहिल्या प्रयत्न सहज दिलास व 350 पर्यंत नीट मध्ये मजल मारलीस. दुसऱ्या प्रयत्नात तू  p w सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून नीट मध्ये 632 मार्क्स घेऊन घवघवीत यश संपादन केलस. अत्यंत कमी पैशात व घरी खेड्यात राहून प्रसंगी वडिलांना दुकानात व शेतात मदत करून स्वतःला सिद्ध केलंस. तुझ्यासोबत संवाद साधताना तुझ्यातील प्रचंड आत्मविश्वास व तुझा सखोल अभ्यास या दोन्हींची प्रचिती येत होती . पंचतारांकित क्लासेस व भयावह जाहिरातीच्या काळात तू खेड्यात राहून अत्यंत अल्पसाधनात मिळवलेले यश म्हणजे आम्हा शहरी लोकांच्या डोळ्यात घातलेलं झणझणीत अंजन होय. शहरी पालक व पाल्य हे हाऊसे नवसे व गौसे असल्यागत क्लासेसच्या जाळ्यात अडकताना आम्ही पाहत आहोत. जो पालक जितका जास्त शिकलेला व सधन तो तितका जास्त गोंधळलेला दिसून येत आहे. लाखो रुपयांचा चुराडा करून एकीकडे अपयशी होणारी मुलं आम्ही पाहत आहोत, शिक्षणाच्या बाजारात न जाता अत्यंत साधेपणाने तू यश मिळवून एक आदर्श निर्माण केला आहेस .अल्पशिक्षित आई वडील व हालाखीची आर्थिक परिस्थिती ही तुझी अडचण न ठरता प्रेरणा ठरली हे विशेष. मुळात नीट ही परीक्षा तुझ्यासाठी अगदी चिल्लर बाब आहे हे संवादातून जाणवत होतं .भरमसाठ पुस्तके न घेता नेमकेपणांना अभ्यासाचं नियोजन, पीडब्ल्यू सारख्या ऑनलाइन क्लासेस मधून अध्ययन पूर्ण करून घरबसल्या सर्व तयारी व खात्रीशीर निकाल हे काही दोन वर्षात झालेलं नाही. वास्तविक तुझं माध्यमिक शिक्षण हे खूप सकस व परिपूर्ण झालेला आहे व अभ्यासातील परिणामकारकता तुला प्राप्त झालेली आहे. परिस्थितीचे भांडवल न करता त्यातून तू यशाचा राजमार्ग शोधला आहेस .अनिकेत तू अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहेस व या बाजारू शिक्षण व्यवस्थेतील एक आशेचा किरण आहेस

 मित्रा तुला त्रिवार सलाम 

खूप मोठा हो,शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या