🌟जिंतूर तालुक्यातील हज यात्रेकरू यांचा मा.आ.विजय भांबळे यांच्या हस्ते सत्कार....!


🌟यावेळी मौलाना रसूल साहेब यांनी आपले मत व्यक्त करताना हज यात्रेकरूंचा प्रवास सुखाचा होओ अशी सदिच्छा व्यक्त केली🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.०३ जुन) :- जिंतूर तालुक्यातील हज यात्रेकरू यांचा सत्कार आज रोजी मा.आ.विजयराव भांबळे यांच्या हस्ते टी.जे.फंक्शन हॉल जिंतूर येथे करण्यात आला. 

मुस्लिम बांधवांचे सर्वात पवित्र तीर्थ स्थान काबा हे मक्का मदिना या शहरात असून तेथे लाखो भाविक हज यात्रेसाठी उत्सुक असतात. त्यात दरवर्षी अनेक तीर्थ यात्रेकरू हज यात्रेकरिता रवाना होतात. जिंतूर येथे नेहमी प्रमाणे याही वर्षी मा.आ.विजयराव भांबळे यांच्या हस्ते हजला जाणाऱ्या यात्रेकरूंचा सत्कार शहरातील प्रमुख मान्यवर मौलाना जलील साहेब, मौलाना तजमुल्ल साहेब, मौलाना रसूल साहेब, मौलाना सिराज साहेब, मौलाना रशीद साहेब यांच्या उपस्थितीत जिंतूर शहरातील हज यात्रेकरू सय्यद हसम आली, सय्यद साबेर सय्यद मुसा,मोहम्मद याकुब कुरेशी, शेख काल्लुद्दिन हुसेन, अखिल खान खयुम खान, शेख आली शेख बुढन, पठाण होसीन खान, फयाज अहेमद, शेख रहीम ननु, सय्यद मुकरब आली, सय्यद चांदपाषा, बिस्मिल्ला खान, नाजेर खां पठाण, शेख आली कुरेशी तर चारठाणा येथील शेख नासर शेख आमीन इ. चा सत्कार पार पडला.

यावेळी मौलाना रसूल साहेब यांनी आपले मत व्यक्त करताना हज यात्रेकरूंचा प्रवास सुखाचा होओ अशी सदिच्छा व्यक्त केली तर सध्याच्या युगात देशात धर्माधर्मात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजली जात आहे, अनेक राजकीय लोक धर्माच्या नावावर राजकारण करत असून जातीय दंगली घडऊ पाहत आहेत अशा लोकांना आपण वेळीच ओळखले पाहिजे आणि सामाजिक सलोखा राखणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले तसेच यावेळी मौलाना जलील साहेब यांनी मत व्यक्त करताना सांगितले कि, काबा हे अत्यंत पवित्रस्थान असून नशीबवान लोकांनाच हे दर्शन होते अशा पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुचा सन्मान दरवर्षी मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांच्या हस्ते केल्या जातो हि अभिमानाची गोष्ठ आहे मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांनी सर्व हज यात्रेकरूंचा शाल, हार, रुमाल, टोपी व महिलांसाठी हिजाब घालून स्वतः सत्कार केला व सर्व हज यात्रेकरुनी अल्ला ताला ला आपल्या देशात शांतता, भाईचारा व सुकून प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करण्याची विंनती केली. 

या कार्यक्रम प्रसंगी हाजी पाशु कुरेशी साहब, आसेफोद्दिन काझी साहब, रामराव उबाळे, गणेशराव इलग, मनोज थिटे, शौकत लाला, नगरसेवक बाळासाहेब भांबळे, शाहेदबेग मिर्झा, उस्मान पठाण, दलमीर खान पठाण, शोएब जानिमिया, सोहेल सर, संजय निकाळजे, चंद्रकांत बहीरट, दत्तराव काळे, सोहेल सर,  आहेमद बागबान, मिर्झा खदिरबेग मौली साहेब, यांच्यासह कुदरत बेग मिर्झा, छोटू भाई, खुर्शीद भाई, सलीम भाई, गफूर कुरेशी, बारी सर, सलीम काझी, नवाबभाई मेडिकलवाले, उसामा बेग, शेख मौजीद,सय्यद जमीर, बाबू भाई, कादरी सर, मकसूद टेलर, रशीद भाई, वहीद खा, वाजीद भाई, आलम खान, वासेफ काझी, नफीज मामू, मकसूद पठाण, खयुम कादरी, अकबर कुरेशी, इसाक भाई, करीम लाला, अक्कू लाला, हबीब, सय्यद मोसिन, तादील, निझाम काझी, शाहेद सिद्धिकी, अरबाज खान, जुनेद खान, मुजीब बेग, सलीम बेग,सिराज खान यांच्यासह शेकडो मुस्लीम बांधव उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या