🌟गझलकार मिलिंद उमरे यांच्या हस्ते खेमदेव लिखीत आनंदी कादंबरीचे प्रकाशन....!🌟औचित्य : झाडीबोली साहित्य मंडळाची गझल कार्यशाळा🌟

गडचिरोली : दि.१२ जून २०२३: स्थानिक झाडी बोली साहित्य मंडळाच्या वतीने नुकतीच गझल कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत खेमदेव हस्ते यांच्या आनंदी पुस्तकाचे प्रकाशन दै.सकाळचे जिल्हा प्रतिनिधी तथा गझलकार मिलिंद उमरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

    नुकतीच रविवारी गडचिरोली येथे स्थानिक झाडी बोली साहित्य मंडळाच्या वतीने नुकतीच गझल कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत खेमदेव हस्ते यांच्या आनंदी पुस्तकाचे प्रकाशन दै.सकाळचे जिल्हा प्रतिनिधी तथा गझलकार मिलिंद उमरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी पाहुणे म्हणून व्यासपीठावर चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष तथा साहित्यिक अरूण झगडकर, गझलकार दिलीप पाटील, गझलकार प्रशांत भंडारे, झाडीबोली मंडळाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष डॉ.चंद्रकांत लेनगुरे, नाटककार चुडाराम बल्लारपुरे उपस्थित होते. 

     गडचिरोली सारख्या दुर्गम भागात साहित्य निर्मितीची आवड निर्माण व्हावी, नवीन साहित्यिक निर्माण  व्हावे, त्यांना व्यासपीठ, मार्गदर्शन मिळावे यासाठी झाडीबोली साहित्य मंडळाचे  नेहमीच उपक्रम सुरू असतात. हे त्यांचे कार्य जिल्ह्यासाठी भुषण तसेच प्रसशंनीय आहे. असे गौरवोद्गार मिलींद उमरे यांनी काढले. या प्रसंगी कविसंमेलनही घेण्यात आले. त्यात जितेंद्र रायपुरे, मारोती आरेवार, मिलिंद खोब्रागडे, प्रगती चहांदे,अर्पणा नैताम, प्रतिक्षा कोडापे, मालती सेमले, आनंद बावणे, सुनील उराडे, डॉ. देवेन्द मुनघाटे, प्रकाश मशाखेत्री, उपेन्द्र रोहणकर, इत्यादी कवींनी विविध विषयांवर आशयघन रचना सादर केल्या.

    याप्रसंगी मंडळाच्या वतीने लेखक खेमदेव हस्ते यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांनी केले. त्यातून त्यांनी मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश झाडे यांनी केले तर आभार संजीव बोरकर यांनी मानले.

     सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.विनायक धानोरकर, डाॅ.प्रवीण किलनाके, पुरूषोत्तम ठाकरे, वर्षा पडघन, प्रतिक्षा कोडापे, इत्यादीं मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. अशी माहिती कृष्णकुमार निकोडे गुरुजींनी आमच्या वृत्तवाहिनीस दिली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या