🌟पुर्णा शहराची 'शायनिंग सिटी'कडे वाटचाल ? शहरात कोट्यावधी रुपयांच्या विद्युत खांबांसह पथदिव्याचे काम जोरात...!


🌟विद्युतीकरणाच्या नावावर अक्षरशः धुमाकूळ माजवून शहराला कागदोपत्री 'शायनिंग सिटी' बनवण्याचा विचित्र उद्योग🌟पुर्णा (दि.२५ जुन २०२३) - पुर्णा शहराची वाटचाल हळुवारपणे 'शायनिंग सिटी' अर्थात चमकत्या शहराच्या शहराच्या होते की काय ? असा सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला असून संपूर्ण शहरात विविध शासकीय योजनांसह दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत देखील कोट्यावधी रुपयांचा निधी शहरातील विद्युत रोशनाई अर्थात पथदिव्यासाठी केला जात असून शहरातील अनेक भागांसह जुना मोंढा परिसरासह शहराला जोडणाऱ्या बसस्थानक रोड,नवा मोंढा लगतचा आडगाव लासीना मार्गावरील बोर्डीकर प्लॉटींग परिसर,रेल्वे स्थानका समोरील मार्गासह आंबेडकर नगर ते पुर्णा-नांदेड मार्गाला जोडणाऱ्या कॅनॉल लगतचा रोड आदी परिसरांमध्ये कोट्यावधी रुपयांचे विद्युत खांब बसवण्याची जोरदार मोहीम नगर परिषद प्रशासनाने हाती घेतली खरी परंतु या खांबांची अवस्था अक्षरशः शोभेच्या खांबांप्रमाणे झाल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा नगर परिषदेतील आजी/माजी लोकप्रतिनिधींनी विविध शासकीय योजनांसह विविध विधान परिषद/राज्यसभा सदस्यांच्या विशेष निधीसह डिपीडीसी,दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीतून विद्युत रोशनाईच्या नावावर कोट्यावधी रुपयांचे विद्युत साहित्य ज्यात विद्युत खांब,हायमास,एलईडी लाईट,भुमीगत केबल विद्युतीकरणाच्या नावावर अक्षरशः धुमाकूळ माजवून शहराला कागदोपत्री 'शायनिंग सिटी' बनवण्याचा विचित्र उद्योग आरंभला असला तरीही यातील असंख्य विद्युत खांबांवर लाईट कुठेही दिसून येत नाही अनेक खांबावरील लाईटच गायब आहेत तर काही खांब केबल शिवाय उभी केल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे पुर्णा शहर 'शायनिंग सिटी' निव्वळ कागदोपत्रीच झाल्याचे दिसत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या