🌟जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी रस्त्याचे काम १५ दिवसात पूर्ण करण्याच्या दिल्या सुचना🌟
पुर्णा (दि.१५ जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातील माहेर-बानेगाव थांबा रस्त्या कामासाठी मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रतिसाद देत आज गुरुवार दि.१४ जुन २०२४ रोजी जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी स्वतः जातीने उपस्थित राहून या रस्त्याची पाहणी करीत या रस्त्याचे काम येत्या १५ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याने त्यांची कर्तव्यतत्परता पाहून या परिसरातील ग्रामस्थांने त्यांचे कौतुक केले.
पुर्णा तालुक्यातल्या ताडकळस पालम रस्त्यावरील बाणेगाव थांबा पासून माहेर हे गाव साधारणतः ०३ किलोमीटर अंतरावर आहे. ग्रामस्थांना सर्वच कामासाठी ताडकळस पुर्णा परभणी या ठिकाणी जावे लागते. बानेगाव थांबा ते माहेर हा रस्ता कच्चा असल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यात गावाबाहेर जाणे कठीण जात होते या रस्त्यामुळे मोठी आडचण होत असल्याने हा रस्ता करावा अशी गावकऱ्यांची मागील अनेक वर्षापासून मागणी होती या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी गावकऱ्यांनी मागील काळात अनेक आंदोलन देखील केली होती.
जिल्हा वार्षिक नियोजन मधून सोळाशे मीटर साठी ७४ लाखांचा निधी मंजूर झाला. परंतु रस्त्याच्या कामाविरोधात ग्रामस्थांच्या तक्रारी वारंवार येत होत्या बुधवारी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात भिट देऊन पाहणी केली. पावसाळन्यापूर्वी येणार्या पंधरा दिवसात ह्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.
0 टिप्पण्या