🌟पुर्णा शहर बहुजन समाज पार्टीच्या शहराध्यक्ष पदावर संदिप खरे यांची निवड...!


🌟तर पुर्णा शहर प्रभारी पदावर चंद्रकांत कांबळे (पेंटर) यांची निवड🌟

पुर्णा (दि.१७ जुन २०२३) - पुर्णा शहर बहुजन समाज पार्टीची कार्यकारीणी नुकतीच घोषीत करण्यात आली असून बहजन समाज पार्टीच्या शहराध्यक्ष पदावर सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेतृत्व संदिप खरे यांची तर शहर प्रभारीपदावर चंद्रकांत कांबळे (पेंटर) शहर उपाध्यक्षपदी सूर्यकांत (शत्रू) भोळे,शहर सचिवपदी नामदेव खरे,यांची निवड करण्यात आली व नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्या देण्यात आल्या.

 यावेळी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य  भिमराव जोंधळे,बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध रणवीर,जिल्हासचिव अनिल इंगोले,गंगाखेड विधानसभा प्रभारी भैया मस्के,गंगाखेड विधानसभा उपाध्यक्ष माधव मासे,गंगाखेड विधानसभा सचिव प्रकाश खरे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते,हितचितक उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या