🌟धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल....!


🌟बुलढाण्यात राज्यातील पहिला अभिनव उपक्रम🌟 

✍️ मोहन चौकेकर                                                                                        

[बुलढाण्यात आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरातील न.पा च्या शाळा होणार CBSE पॅटर्न, राज्यातील पहिला अभिनव उपक्रम]

                                                                                     बुलढाणा : शैक्षणिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेली सामाजिक विषमता ज्यामुळे उच्चभ्रू व श्रीमंत नागरिक आपल्या पाल्यांना  उच्च दर्जाचे शिक्षण देतात, दुसरीकडे मात्र स्लम व गरीब भागातील नागरिकांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात त्यामुळे ते गुन्हेगारी विश्वाकडे वळतात ही विषमता दूर व्हावी याकरिता बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर  संजयभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा नगरपालिकेच्या माध्यमातून ०४ कोटी रुपये खर्च करून अद्यावत अशा  CBSE दर्जाच्या पॅटर्नच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहे, या कार्याचा पहिला टप्पा म्हणून आज दिनांक १५ जून २०२३ रोजी शासकीय डी.एड कॉलेज येथील सभागृहामध्ये उच्चशिक्षित महिला शिक्षकांचा  तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, याकरिता नागपूर येथील श्रीमती अमृता वानखेडे यांना निमंत्रित करण्यात आले होते, यावेळी न.पा.C.O श्री गणेश पांडे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता श्री गुलाबराव कऱ्हाळे,पत्रकार  राजेंद्र काळे उपस्थित होते, यावेळी मार्गदर्शन करताना  आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी सांगितले की बुलढाणा शहरांमध्ये बुलढाणा नगरपालिकेच्या माध्यमातून राज्यामध्ये पहिल्यांदाच गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या तऱ्हेची शिक्षण मिळावे याकरता नर्सरी,KG-1, KG-2 या सीबीएससी पॅटर्नच्या शिक्षणाला सुरुवात होत आहे, या मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलांना बाहेरील बाहेरील नामांकित शाळेपेक्षा सुद्धा अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण देण्यात येईल, मुलांना यामध्ये त्यांचा पोशाख दप्तर आणि सर्व सुविधा देण्यात येतील तसेच २९ जून तारखेला या सर्व मुलांचा तसेच त्यांच्या पालकांचा मेळावा तसेच ३०जून  तारखेला सर्व मुलांचे वाजत-गाजत शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी स्वागत करण्यात येईल तसेच पुढील वर्षी  शहरातील चैतन्यवाडी येथील नगरपालिकेचे शाळेमध्ये ५ते ६ कोटी रुपये खर्चून  यावर्षीपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच जिल्हा परिषदेची जी बीयोटीची बिल्डिंग आहे ती देखील सीबीएससी पॅटर्न साठी मंजूर झालेली आहे ती सुद्धा १० ते २० ऑगस्ट च्या दरम्यान सुरू करणार असून त्यामध्ये देखील हजाराच्या वर विद्यार्थी शिक्षण घेतील.

भविष्यामध्ये बुलढाणा शहर तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील कोणताही विद्यार्थी  शिक्षणासाठी वंचित राहणार नाही तसेच याकरता निधी कुठेच कमी पडु देणार नाही असे देखील धर्मवीर आमदार  संजयभाऊ गायकवाड,  यांनी यावेळी बोलताना सांगितले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुलढाणा नगरपालिकेचे उचललेले हे खुप मोठे पाऊल आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रभर घेतले जाईल हे कार्य करून खूप मोठं असं एक पिढी घडवण्याचं महान कार्य आमच्या अजून होत आहे.

बुलढाणा शहरातील तसेच मतदार संघातील ज्या नागरिकांकडे शिक्षणासाठी पैसा नाही  त्यांनी आपल्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवता अल्प दरामध्ये नगरपालिका जी शिक्षण देत आहे यामध्ये त्यांनी आपल्या मुलांची ऍडमिशन करावी असे आव्हान धर्मवीर आमदार  संजयभाऊ गायकवाड यांनी केले आहे........

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या