🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟जालन्यात कारमध्ये महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला नवं वळण, पतीला बेड्या🌟

 ✍️ मोहन चौकेकर

 * पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव, त्यांनी आमचा डबलगेम केला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आरोप ; माझा पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार का पडले ? शरद पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर ; शरद पवार यांचे सत्य शेवटी बाहेर आलं, याचा अतिशय आनंद झाला: देवेंद्र फडणवीस 

* गेल्या सहा महिन्यात 4,434 मुली बेपत्ता, सत्ताधाऱ्यांनी बाष्कळ वक्तव्ये न करता महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं; शरद पवारांचा हल्लाबोल ; समान नागरी कायद्यावर शीख, जैन आणि पारशी समुदायाचं मत लक्षात घ्यावं, मग आम्ही भूमिका मांडू: शरद पवार 

* रश्मी ठाकरेंना चौकशीला बोलवणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मैदानात उतरतो तेव्हा कागदपत्र घेऊनच उतरतो! ; वादग्रस्त जाहिरातीबद्दल शिंदेंनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केली : देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण 

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी ; हे राज्य सुफलाम सुफलाम होऊ दे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्यातील जनता सुखी व समाधानी होऊ असे साकडे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाला साकडं.  

* विठुरायाच्या दर्शन रांगेत अभूतपूर्व गोंधळ ; शासकीय महापूजेनंतरही दर्शन रांग वेगाने पुढे सरकत नसल्याने भाविक आक्रमक, मंदिर समिती मुर्दाबादच्या घोषणा. 

* राज्यभरात आषाढी एकादशी व बकरी ईद उत्साहात साजरी, अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम पार पडला. 

* कोरोनाकाळात आरोग्यदूत म्हणून मिरवणारा निघाला गुटखा माफिया, महाराष्ट्रात गुटख्याचं अवैध नेटवर्क चालवत असल्याचं समोर. 

* जालन्यात कारमध्ये महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला नवं वळण, पतीला बेड्या.

* राज्यात पावसाचं टायमिंग चुकलं! शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट  पेरणी हंगाम संपत आला, काही  जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा; भात, सोयाबीन उत्पादन घटण्याचा धोका ;राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट.

* वर्ल्डकपपूर्वी मोठा खुलासा; 4 भारतीय खेळाडूंनी IPL मध्ये केलं असं काही की... T-20 टीममधून पत्ता कट ?

* लेशपाल 'त्या मुलीची जात कोणती?, सदाशिव पेठेत मुलीला वाचवणाऱ्या लेशपालला मेसेजद्वारे विचारणा,इन्स्टा स्टोरी चर्चेत.

* कणकवलीच्या पारंपरिक वांग्याला मिळाली हक्काची ओळख, 'कासरल वांगी' नावानं मिळालं पेटंट ; शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश 

* आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची फायनलमध्ये धडक, इराणवर 33-28 च्या फरकाने केली मात 

* चीननं 'जैविक शस्त्र' म्हणून कोरोना विषाणू तयार केला, वुहानच्या संशोधकाकडून धक्कादायक माहिती उघड.

* अंतराळात सापडली 'सोन्याची खाण', नासानं आणखी एक रहस्य उलगडलं; ...तर पृथ्वीवरील प्रत्येक जण होईल अब्जाधीश

* विदर्भात उद्यापासून शाळांची घंटा वाजणार, विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी.

* राज्यात पावसाचं टायमिंग चुकलं! शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट

* आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं मराठीत खास ट्वीट.

* राज्यात नवी 9 वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

* मुंबईकरांना दिलासा! मेट्रो प्रकल्पामुळे अडवलेले ८४ किमीचे रस्ते वाहतुकीसाठी मोकळे

* एमबीबीएसनंतरची ‘नेक्स्ट’ परीक्षा होणार दोन टप्प्यात, 28 जुलैला मॉक टेस्ट

* ट्विटरने अक्षर मर्यादेत केला मोठा बदल ! आता युजर्सना करता येणार 25 हजार शब्दांपर्यंत ट्विट.

* निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठींचं निलंबन मागे; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्या - सत्यजीत तांबे. 

* आरटीई प्रवेशातील प्रतीक्षा यादीचा दुसरा टप्पा जाहीर, 8 हजार 826 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड. 

* सहकारी संस्थांची निवडणूक आता 30 सप्टेंबरनंतर, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; पावसाळ्याचे दिले कारण. 

* उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या, कथित 19 बंगल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल. 

* 'समान नागरी' बाबत कायदा मंत्र्यांचे मोठे विधान, "१३ जुलैपर्यंत वाट पाहा ..."

* अंतिम निर्णय येईपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे औरंगाबाद हे जुनेच नाव वापरणार; सरकारची उच्च न्यायालयाला हमी. 

* मणिपूर दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींचा ताफा पोलिसांनी अडवला, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक अखेर.

* 'सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी नवे पुरावे सापडले', देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा.                                

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या