🌟पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील बदली झालेल्या शिक्षकांचा अभूतपूर्व निरोप समारंभ संपन्न...!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोकारे व उपाध्यक्ष बापूराव बोकारे हे होते🌟


पुर्णा (दि.२५ जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.२४ जुन २०२३ रोजी बदलीने नव्याने रुजू झालेले शिक्षक यांचा स्वागत सोहळा व बदली झालेल्या शिक्षकांना अभूतपूर्व निरोप समारंभ संपन्न झाला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोकारे व उपाध्यक्ष बापूराव बोकारे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून पूर्णेचे मा.पं. स.सभापती अशोकराव बोकारे,पोलीस पाटील ग्यानोबा बोकारे, शाळेचे मुख्याध्यापक गोविंद नलबलवार व तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य हे उपस्थित होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेच्या प्रतिमांचे पुजन सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

        बदलीने आलेले शिक्षक अशोक बालुरे,शंकर शेट्टीवार,तुकाराम बेटकर,नवनाथ खंदारे,मुकुंद तरफदार व कल्पना कुलकर्णी यांचा सत्कार शाल,हार व श्रीफळ देऊन संपन्न झाला.व त्याचबरोबर उत्कृष्ट कार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक गोविंद नलबलवार,शिक्षक गणेश कुऱ्हे, अंगणवाडीताई अर्चना देसाई,स्वयंसेवक दत्तराव बोकारे यांचा ही सत्कार करण्यात आला.

          त्यानंतर बदली झालेले, शाळेचा व विद्यार्थ्यांचा कायापालट करणारे शिक्षक भागवत शिंदे,आबनराव पारवे,विलास बोकारे व योगिता कुलकर्णी यांचा शाल,श्रीफळ,हार,पुष्पगुच्छ व दर्जेदार सन्मानपत्र देऊन न भूतो न भविष्यती असा निरोपाचा सोहळा संपन्न झाला पंचायत समितीचे मा.सभापती अशोकराव बोकारे यांनी शिक्षकांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.शाळेचे नूतन शिक्षक मुकुंद तरफदार यांनी आम्ही या पुढेही शाळेत दर्जेदार काम करू असा मानस व्यक्त केला.नवनाथ खंदारे सर यांनी पण आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचा व शाळेचा विकास करणार असा ठाम निर्धार केला.

       निरोपाच्या भाषणात योगिता कुलकर्णी यांनी माहेराहून लेकीला पाठविण्यासाठी संपूर्ण गाव आला आहे,असे शब्द उच्चारताच उपस्थित सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.विलास बोकारे यांनी पण मागील तेरा वर्षात शाळेत केलेली रंगरंगोटी असो,लोकवर्गणीतुन झालेली कामे असोत,गुणवत्तापूर्ण शिक्षण असो हे विशद केले.आबनराव पारवे यांनी शाळेत राबविण्यात आलेले सर्व उपक्रम सांगितले.गावकऱ्यांनी आम्हाला दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही कायम आपल्या ऋणात राहू.भागवत शिंदे यांनी पण आम्हाला आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मनसोक्त काम करता आल,असे मनोगत मांडले.सर्व वातावरण अगदी भावनिक झाले होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटिल ग्यानोबा बोकारे यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन हनुमान बोकारे यांनी केले निरोपाच्या या प्रसंगी शिक्षकांवर माया असणारे गावातील मोठ्या संख्येने महिला,पुरुष,आबालवृद्ध, शाळेचे आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपले शिक्षक बदलीने दुसऱ्या गावी गेले म्हणून सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते बदली झालेल्या शिक्षकांनी शाळेला एक 43 इंची एल ई डी टी व्ही भेट दिला.

      शाळा व्यवस्थापन समिती व समस्त गावकरी मंडळी यांनी आखीव रेखीव असा कार्यक्रम आयोजित केला सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले स्वागताचा व निरोपाचा हा देखणा सोहळा संपन्न झाला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या