🌟समता सैनिक दलामध्ये युवकांनी सहभागी व्हावे - भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो


🌟पुर्णेतील डॉ.आंबेडकर नगरातील सांची प्रतिकृती प्रवेशद्वारा पासून समता सैनिक दलाचे पथसंचलन🌟 


पुर्णा (दि.३० जुन २०२३) - येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा पूर्णाच्या वतीने बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी एक दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन काल गुरुवार दि.२९ जुन २०२३ या दिवशी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.सकाळी ११-०० वाजता डॉक्टर आंबेडकर नगर पूर्णा येथून सांची प्रतिकृती प्रवेशद्वारापासून समता सैनिक दलाचे पथसंचलन अमोल कॉर्नर मार्गे बुद्ध विहारा पर्यंत करण्यात आले.

यामध्ये पन्नास समता सैनिक दलाचे जवान सहभागी झाले होते बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी अखिल भारतीय भिक्कु संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो भदंत पै य्या वंश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  समता सैनिक दलाचे डिव्हिजनल कमांडर आनंद भेरजे  भारतीय बौद्ध महासभेचे परभणी उत्तर जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे समता सैनिक दलाचे मेजर प्रशिक्षक नरेंद्र सोनुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे माजी तालुकाध्यक्ष एम यु खंदारे तालुका सचिव अतुल गवळी तालुका उपाध्यक्ष ज्ञानोबा जोंधळे भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य तुकाराम ढगे किशोर ढा क रगे मुंजाजी गायकवाड बौद्धाचार्य उमेश बऱ्हा टे बौद्धाचार्य अमृत कऱ्हाळे सामाजिक कार्यकर्ते सुनील मगरे श्यामसुंदर काळे एडवोकेट राहुल कांबळे आदींची उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या हस्ते बुद्ध विहारांमध्ये महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

समता सैनिक दल उपस्थित भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पयावंश यांनी त्रिशरण पंचशील दिले यावेळी थायलंड येथून आणलेली महामानव तथागत भगवान बुद्धांची मूर्ती समता सैनिक दलाचे डिव्हिजनल कमांडर आनंद भेरजे यांना प्रतिनिधिक स्वरूपामध्ये बुद्ध विहारा तर्फे भेट देण्यात आली समता सैनिक दलाच्या जवानांनी बुद्ध विहारांमध्ये मानवंदना दिली.

यावेळी संबोधित करताना भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी समता सैनिक दलाची समाजासाठी उपयोगिता विशद केली तरुणांनी व्यसनापासून वाईट सवयी पासून अलिप्त राहून समता सैनिक दलामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान केले सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांनी शिबिराला भेट देऊन सर्वांचे पुष्पहार देऊन स्वागत केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या