🌟यत्किंचितही अपेक्षा न ठेवता उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी लढणारा कर्तृत्ववान विधिज्ञ तथा तरुणांच्या हृदयातील नायक..!


🌟तरुण तडफदार नगर सेवक ॲड.राजेश भालेराव यांचा १३ जुन रोजी 'प्रकट दिन' अभिष्ठचिंतन सोहळा🌟

✍🏻व्यक्ती आणि व्यक्तीमत्व : चौधरी दिनेश (रणजीत) 

 यत्किंचितही अपेक्षा न ठेवता उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी कायद्याची बाजू प्रखरपणे मांडणारे परभणी जिल्ह्यातील बुध्दीमान विधिज्ञ.....जनसामान्यांच्या अमुल्य मतांसह त्यांच्या मनमर्जीची प्रखर्शाने जाणीव ठेवून शहरातील प्रत्येक विकासकामांना पाठबळ देऊन विकासनशील शहरासाठी सदैव धडपडणारे लोकप्रतिनिधी.....शहरासह आपल्या प्रभाग परिसरातील तरुणांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून वेळ प्रसंगी प्रत्येक वेळी धावून येणारे तरुणांच्या हृदयातील नायक....'ओठात एक अन् पोटात एक' या राजकीय कपटनितीचा कायम दाहसंस्कार करुन अगदी निर्मळ हृदयाने प्रत्येकाला खंबीरपणे साथ देणारे राजकीय क्षेत्रातील एकमेव उभरते व्यक्तीमत्व म्हणजे नगर सेवक ॲड.राजेश भालेराव... ' आधार दिल्यागत खांद्यावर ठेवायचा हसत मुखाने हात...मुखात गोडवा जनू मुखात साखरभात अन् प्रत्येक वेळी प्रत्येकाचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर ? शेवटी बुडावर बुटासहीत लात अन् विश्वासाने आधार म्हणून सोबत राहणाऱ्यांचा विश्वासघात' अश्या अत्यंत हलकट गलिच्छ राजकीय वातावरणात देखील स्वतःचे एक वेगळे वर्चस्व निर्माण करीत कोळस्याच्या खाणीतील कोहीनूर हिऱ्या प्रमाणे पुर्णा तालुक्यातल्या राजकीय क्षेत्रातील अनमोल कोहीनूर म्हणजे आमचे मित्र तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कर्तृत्ववान बुध्दीमान झुंजार तरुण तडफदार नगर सेवक ॲड.राजेश विष्णूकांत भालेराव यांचा १३ जुन २०२३ रोजी 'प्रकट दिन' अर्थात अभिष्ठचिंतन सोहळा असल्यामुळे त्यांचा हा अभिष्ठचिंतन सोहळा पुर्णा शहरातील तरुणांसाठी 'जागृक युवा सप्ताह' म्हणून प्रेरणादायी ठरणार आहे स्वकर्तृत्व-कर्तव्य-बुध्दीमत्ता-जवाबदारी-समाजहीत-संघर्ष-तत्वनिष्ठता या सप्तगुनांचा अंगीगार करणारे सद्गृहस्थ म्हणून ज्यांना ओळखले जाते अश्या या कर्तृत्ववान लोकप्रतिनिधीला अभिष्ठचिंतळ सोहळ्याच्या जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स परिवार,शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र परिवाराकडून अगदी निर्मळ हृदयातून आभाळभर शुभेच्छा......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या