🌟पुण्याचे लाचखोर अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ.अनिल रामोड यांचे अखेर निलंबन...!


🌟 ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्याचे डॉ.रामोड यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश🌟 

पुणे (दि.२२ जुन २०२३) - पुणे येथील लाचखोर अतिरिक्त विभागीय आयुक्त तथा आयएएस अधिकारी डॉ.अनिल रामोड यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले असून मागील  आठवड्यात त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. रामोड ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्याचे कारण सांगून त्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील जागेच्या भूसंपादनाच्या बदल्यात जादा रक्कमेचा मोबादला मिळवून देण्यासाठी डॉ.रामोड यांनी तब्बल ०८ लाख रुपयांची लाच घेतल्याने सीबीआयने १० जुन २०२३ रोजी अटक केली होती. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. रामोड न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयच्या मागणीनुसार, विभागीय आयुक्तालयाने पाठविलेल्या निलंबनाच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली. निलंबनानंतरही त्यांनी पुणे मुख्यालय सोडून जाऊ नये; तसेच कोणतीही खासगी नोकरी अथवा अन्य व्यवसाय करू नये. विभागीय आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय पुण्याबाहेर जाऊ नये, असेही निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या