🌟केंद्रप्रमुखांच्या पदभरतीला सामाजिक आरक्षण लागू करा....!


🌟कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सिद्धार्थ मस्के यांनी निवेदनाद्वारे केली शिक्षण अधिकारी यांच्याकडे मागणी🌟

परभणी (दि.21जुन 2023) - जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या केंद्रप्रमुखांच्या स्पर्धा परिक्षेद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये सामाजिक आरक्षण लागू करून पदभरती करावी अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सिद्धार्थ मस्के यांनी निवेदनाद्वारे काल 19 जून रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या मार्फत शालेय शिक्षण मंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यात करण्याचे नियोजन शासनाने केले आहे.राज्यातील केंद्रप्रमुखांच्या सरळसेवा भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शासन निर्णय 1-12-2022 नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरती साठी उपलब्ध जिल्हानिहाय पदांची संख्या नमूद करण्यात आली आहे.परंतु सामाजिक आरक्षणानुसार पदांची संख्या दर्शविलेली नाही.सदर पदे ही स्पर्धा परीक्षेने भरत असल्यामुळे या भरतीला सरळसेवा भरतीचे निकष लावून या भरतीला असलेले सामाजिक आरक्षण लागू करण्याची मागणी करून मागासवर्गीय शिक्षकांना न्याय देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सिद्धार्थ मस्के यांची स्वाक्षरी आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या