🌟पुर्णेतील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात योगदिन मोठ्या उत्साहात साजरा...!


🌟या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रा.डॉ.संतोष कुऱ्हे हे होते🌟


पूर्णा (दि.२१ जुन २०२३) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रा.डॉ.संतोष कुऱ्हे हे होते. यावेळी योग दिवसाचे महत्त्व प्रमुख पाहुणे ज्योती अंबेकर व निरज अंबेकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. संतोष कुऱ्हे यांनी मांडले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ संजय कसाब यांनी केले. या कार्यक्रमासाठी क्रीडा संचालक डॉ भारत चापके व महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. 

 याप्रसंगी योग प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या