🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार🌟

 ✍️मोहन चौकेकर 

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल 

* येणाऱ्या 5 वर्षात देशभरात सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक बसगाड्यांनी करण्याचे प्रयत्न,रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची घोषणा

* तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे -फडणवीसांची युती फोडून दाखवतो-- शशिकांत शिंदे यांचे आव्हान

*नंदुरबारला चक्रीवादळाचा फटका; 35 शेळ्यांचा मृत्यू; घर, शाळांवरची पत्रे उडाले

* LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम

* गुवाहाटीत इंडिगो विमानाची एमर्जन्सी लँडिंग, दिब्रुगडला जाणाऱ्या प्लेनमध्ये होते केंद्रीय मंत्र्यासह 2 आमदार

* टाटांना सॅल्यूट! सामाजिक बंधने झुगारुन LGBTQIA+ समुदायाला देखील नोकऱ्यांमध्ये करुन घेतलं सहभागी

* पुण्यात कोयता गँगचा हैदोस सुरू; टोळक्याकडून वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये दहशत

* 'कॅग' अहवालाला दुर्लक्षित करण्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे?', प्रियांका गांधींचा केंद्र सरकारला सवाल

* कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यात येणार केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा ; लवकरच तसा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार 

* जळगावच्या स्टेट बँकेवरील  तीन कोटी रुपयांच्या सोने व 17 लाख  रुपयांच्या दरोड्याच्या तपास अखेर लागला ; निलंबित पोलिस उपनिरीक्षक/ PSI व त्याच्या वडिलसह बॅकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला पोलिसांनी केली अटक 

 * गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

* मुंबईत 16 जूनपासून पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता, दरवाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे

*ओडिशा ट्रेन दुर्घटनेची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

* दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये भीषण आग, 100 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक ; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

* उत्तराखंडमध्ये 3 मंदिरांमध्ये महिला आणि मुलींसाठी ड्रेस कोड लागू; तोडके कपडे घालणाऱ्या महिलांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही

*लातुर येथील सृष्टी जगताप सलग 126 तास नृत्य करुन केला जागतिक विक्रम; ग्रिर्नींज बुकात झाली नोंद 

* रेल्वे अपघातातील जखमींना सर्वोतोपरी मदत केली जात असून अशा मुद्द्यांचं राजकारण करू नये - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

*राज्यात पुणे हे फायनान्स हब होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, पुणे शहरात मोठे गुंतवणूक प्रकल्प येत आहेत :-

बजाज फिनसर्व कंपनी राज्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुणे येथे होणार आहे.

यामुळे ४० हजार जणांना रोजगार मिळणार आहे. अलीकडच्या काळातील राज्यात झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हिंदुजा ग्रुप महाराष्ट्रात एकूण 12 क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक तब्बल 35 हजार कोटी रुपयांची आहे.

या गुंतवणुकीतून दीड लाख नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा सरकारने केला होता.

* मंत्री दादा भुसे यांची चौकशी कधी होणार -- संजय राऊत

ईडी ने पुणे नगर परिसरातील vips groups वर आज छापे टाकले.या वित्तीय संस्थेने गुंतवणूकदारांकडून 125 कोटी रुपये जमा केले आणि हवाला व्यवहारात वळवले.असेच प्रकरण गिरणा सहकारी साखर कारखान्याचे आहे..

मंत्री दादा भुसे यांनी शेतकरी बांधवांकडून 178 कोटी रुपये गोळा केले.त्याचा हिशोब गायब आहे. मी सीबीआय आणि ईडी कडे  रीतसर तक्रार केली आहे. त्यांच्यावर छापे कधी पडणार? असा सवाल खा. संजय राऊत यांनी विचारला आहे.

* पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा उंचावण्यासाठी जाहिरातींवर 2300 कोटी  रुपये खर्च -- काॅग्रेसने केला आरोप : काँग्रेसने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं आहे. नरेंद्र मोदींची प्रतिमा उंचावण्यासाठी मोदी सरकारने तब्बल २३०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

* देशातील पहिला लिथियम आयन बॅटरी बनवणारा प्रकल्प गुजरातमध्ये :-

देशातील पहिला लिथियम-आयन बॅटरी बनवणारा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येत आहे. यासाठी टाटा ग्रुपने गुजरात सरकारशी १३ हजार कोटींचा करार केला आहे. 

* देशातील अतिप्रदूषित ९४ शहरांपैकी, २० शहरे ही एकट्या महाराष्ट्रातील :-

मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी, बदलापूर, पुणे, पिंपरी, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, औरंगाबाद, जालना, लातूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर या शहरांमधील हवेची गुणवत्ता मानकांनुसार वाईट आहे. 

* पॅरासिटामॉल कॉम्बिनेशनसह १४ प्रकारच्या औषधांवर बंदी :-

सरकारने १४ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDCs) औषधांवर बंदी घातली आहे. यामध्ये निमसुलाइड आणि पॅरासिटामॉल डिस्पर्सिबल गोळ्या, क्लोफेनिरामाइन मॅलेट आणि कोडीन सिरप यांचा समावेश आहे. या औषधांचा वापर मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. या औषधांचे वितरण, उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली.

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या