🌟पुर्णेत बकरी ईद उत्साहात साजरी : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनी कुर्बानी देण्याचे टाळले....!

 


🌟शहरात हिंदु-मुस्लीम बांधवांनी ईद व आषाढी एकदशीच्या एकमेकांना शुभेच्छा देत घडवले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन🌟

पुर्णा (दि.३० जुन २०२३) - आषाढी एकादशी व बकरी ईद (ईद उल अजहा) एकाच दिवशी आल्यामुळे पुर्णा शहरासह तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी काल गुरुवार दि.२९ जुन २०२३ रोजी आषाढी एकादशी असल्यामुळे पारंपारिक कुर्बानी देण्याचे टाळत ईद साजरी केल्याचे चित्र काल पाहावयास मिळाले तर शहरासह तालुक्यातील हिंदु-मुस्लीम बांधवांनी ईद व आषाढी एकादशीच्या एकमेकांना शुभेच्छा देत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले.

पुर्णा शहरासह तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी ईद उल अजहाची नमाज शहरातील ईदगाह मैदानावर जामा मस्जिदचे शाही इमाम शमीम रिझवी साहब यांच्या हस्ते पार पडली या नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी देशात सुख शांती व समृद्धीसाठी अल्लाहकडे प्रार्थना केली.उपस्थित समाज बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना यावेळी ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पोलिस प्रशासना तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एकंदर शहरासह तालुक्यात ईद व आषाढी एकादशी सन शांततेत व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवत शांततेत साजरे झाले.

यावेळी ईदचा सन ऐन पावसाळ्यात आल्याने मुस्लिम बांधवांनी ईदगाहसह मस्तान पुरा येथील मस्जिद,दारुल उलूम,कुरेशी मोहल्ला मस्जिद,अलिनगर मस्जिद मध्ये बकरी ईदची नमाज अदा केली.बकरी ईद च्या नमाज नंतर अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मादेव गावडे,पो.नि. सुभाषचंद्र मारकड,डिएसबीचे भगवानराव वाघमारे,गोपनीय विभागाचे भिसे,जाधव,काळे,एमआयएमचे तालुकाध्यक्ष शेख शफीक आदींनी ईदगाह येथे उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या