🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟दिल्ली-एनसीआरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; पाकिस्तान आणि चीनलाही फटका🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* अयोध्यामध्ये 22 जानेवारी 2024 ला होणार प्रभु श्रीरामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना; त्यानंतर भाविकांना दर्शन घेता येणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले निमंत्रण 

* मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर केमिकलच्या टँकरला आग; चार जणांचा मृत्यू, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

* लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना म्हाडाचा दणका; 11 टक्के घरांची तरतूद रद्द

* पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफ; आजपासून स्टीकर मिळणार

* मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता MBBS अभ्यासक्रम 9 वर्षांतच पूर्ण करावा लागणार!

* शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! कंत्राटी ग्रामसेवकांच्या  मानधनात 10 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची  मोठी मदत जाहीर 

* दिल्ली-एनसीआरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; पाकिस्तान आणि चीनलाही फटका

* मराठवाड्यातील 18 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या, महसूल विभागाने काढले आदेश

* जम्मू काश्मीरमधल्या कुपवाड जिल्ह्यात सुरक्षा दालने केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

* मंत्रिमंडळाच्या बैठकीत सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1500 कोटी रुपये मंजूर

* सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना दिला कडक इशारा, लोकांची दिशाभूल केल्यास होणार कडक कारवाई.

* राष्ट्रमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अश्या आशयाची जाहिरात शिंदे गटाकडून प्रसिध्

* 18 राज्यांमध्ये मल्टी नॅशनल कंपनीच्या एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून चक्क अडीच कोटी रुपये करण्यात आले गायब

* ठाकरे गटाचे खासदार असलेल्या धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 15 जूनला सभा

* 70 हजार तरुणांना मिळाला रोजगार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप; घराणेशाहीमुळे तरुणांचं भविष्य पणाला -- पंतप्रधान नरेंद्र मोदी

* दिल्ली मध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जवळ 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप

* अक्षय भालेराव खून प्रकरण :अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा,आरोपींना फाशीची शिक्षा द्या

* कलेचा मान:बोरगावकरांच्या 'नदीष्ट'ला 5 लाखांचा राष्ट्रभाषा सन्मान; बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका गीतांजली श्री यांच्या हस्ते गौरव

* अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांची येरवडा कारागृहात रवानगी

* सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना दिला कडक इशारा, लोकांची दिशाभूल केल्यास होणार कडक कारवाई

* पदवीच्या प्रथम वर्षांला प्रवेश घेणार्‍यांना 15 जून पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ

* एमआरफ कंपनीच्या शेअर्सने रचला इतिहास ; एमाआरफ कंपनीच्या  एका  शेयरची किंमत झाली एक लाख रुपये 

* सायबर संरक्षणाबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार ; लवकरच राबवण्यात येणार आर्थिक साक्षरता विशेष अभियान

* स्वतःची टिमकी वाजवणारं सरकार, शिंदे गटाच्या जाहिरातीवरून चंद्रकांत खैरेंची खोचक टीका

* बियाणे घोटाळा : छत्रपती संभाजीनगर मध्ये साडेआठशे रुपयांची कापसाची बॅग तब्बल 2300 रुपयांना विकल्याने सर्वत्र खळबळ 

* लव्ह जिहाद कायदा केंद्राच्या अजेंड्यावर नाही ; पंकजा मुंडेंचा भाजप नेत्यांना घराचा आहेर

* अभिनेते कझान खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या