🌟विशेष मोहीमे अंतर्गत केलेल्या कारवाईत ७१ हजार ९९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त🌟
परभणी/पाथरी (दि.२८ जुन २०२३) - आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी तसेच आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नांदेड उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनात व अध्यक्ष राज्य उत्पादन शुल्क परभणी गणेश पाटील यांनी दिलेल्या निदर्शनाप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क परभणी विभागाचे निरीक्षक सु.अ.चव्हाण पथक प्रमुख यांच्या नेतृत्वात आज बुधवार दि.२८ जुन २०२३ रोजी पथक तयार करून परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील पारधी वाडा इंदिरानगर येथे हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्रावर धाड टाकण्यात आली.
या कारवाईत ०९ आरोपीं विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाईत नमूद आरोपी गुळ मिश्रित रसायन २१०० लिटर ५५ लिटर हातभट्टी दारू व ०९ लिटर देशी दारू व इतर साहित्य असा एकूण ७१ हजार ९९० रुपयें किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावेळी आरोपी निलाबाई भाऊराव पवार राहणार पारधी वाडा पाथरी रायभाई पंजाब चव्हाण राहणार पारधी वाडा पाथरी नर्मदाबाई अशोक काळे राहणार पारधी वाडा पाथरी कमलबाई भाशा काळे राहणार इंदिरानगर पाथरी शिवाजी रंगनाथ ढवळे राहणार भीम नगर पाथरी चंद्रकला अर्जुन जाधव राहणार इंदिरानगर पाथरी मंगल दिनेश जाधव इंदिरानगर पाथरी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहे सदर कारवाई पथक प्रमुख सु अ चव्हाण निरीक्षक परभणी यांच्यासह बी एस मंडलवार दुय्यम निरीक्षक भरारी पथक परभणी ए जे सय्यद दुय्यम निरीक्षक परभणी एस आर आल्हाट दुय्यम निरीक्षक पाथरी वाय एस शिर्के दुय्यम निरीक्षक भरारी पथक परभणी तसेच जवान वर्ग राहुल बोईनवाड, ऋषिकेश साळवे, भिमेश्वर पुपोलवार, यांनी कारवाई केली....
0 टिप्पण्या