🌟शिक्षण तज्ञ डॉ.प्राची साठे करणार शिबिरात मार्गदर्शन🌟
परभणी(दि.१९ जुन २०२३) - परभणी येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात बुधवार दि.२१ जून २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजता "स्व जाणीव विकसित करूया" या विषयावर उद्बोधन शिबिराचे आयोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.या उद्बोधन शिबिरात प्रसिद्ध शिक्षण तज्ञ तथा महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रमच्या समन्वयक डॉ.प्राची साठे या सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरासाठी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी,सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत.विद्यार्थ्यांना अध्यापन करतांना स्व जाणीव आवश्यक असते.तसेच शिक्षक,अधिकारी यांनाही या विषयाचा अत्यंत उपयोग काम करतांना होतो.अतिशय चांगल्या विषयावर हे उद्बोधन होणार असून डॉ.प्राची साठे यांचे मार्गदर्शन यामध्ये होणार आहे.यामुळे सर्वांनी या उद्बोधन शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे,उपशिक्षणाधिकारी श्रीपाद देशपांडे यांनी केले आहे......
0 टिप्पण्या