🌟भारतीय प्रशासन सेवेतील धडाकेबाज आएएस अधिकारी तथा विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती....!


🌟राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी केला स्वेच्छा निवृत्ती अर्ज मंजूर🌟

परभणी (दि.२७ जुन २०२३) : छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त भारतीय प्रशासन सेवेतील धडाकेबाज आएएस अधिकारी अशी ओळख असणारे परभणी जिल्ह्याचे भुमीपुत्र श्री सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला असून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी त्यांच्या या स्वेच्छा निवृत्तीच्या अर्जास मंजूरी बहाल केली आहे.

            मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी राज्य सरकारकडे गेल्या महिन्यात स्वेच्छा निवृत्तीसंदर्भात अर्ज केला होता. मात्र, त्यांच्या या निर्णयावर न्यायालयाने केंद्रेकर यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेला अर्ज सरकारने स्वीकारू नये, असा आदेश दिला. मार्च २०२४ पर्यंत स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेला अर्ज स्वीकारू नये,असे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे स्पष्ट आदेश आहेत छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नेमलेल्या समितीवर केंद्रेकर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मार्च २०२४ पर्यंत ही योजना अंतिम टप्प्यात आली असेल, तोपर्यंत तो अर्ज स्वीकारू, नये असे खंडपीठाने म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवरसुध्दा केंद्रेकर यांचा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज सामान्य प्रशासन विभागाद्वारे मंजूर झाल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

🌟परभणीच्या भूमिपुत्राच्या निर्णयाने खळबळ :-

             परभणीचे भूमिपुत्र असणारे केंद्रेकर हे राज्यातील काही मोजक्या धडाकेबाज आयएएस अधिकार्‍यांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त आणि आता विभागीय आयुक्त पदावर त्यांनी काम केले. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कठोर भूमिका घेतल्या. वेळप्रसंगी दबावतंत्र वगैरे झुगारून लावले. केंद्रेकर यांच्या कारकिर्दीत बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांच्या बदलीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. अख्खा बीड जिल्हा त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या