🌟पुज्य भिक्खू संघ व भारतीय बौध्द महासभा यांच्या द्वारे हा बौध्द विवाह संपन्न करण्यात आला🌟
परभणी (दि.०७ जुन २०२३) परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील लक्ष्मण शिंदे व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्रीरंग पवार या दोन्ही परिवार परिवर्तन वादी विचारधारेत सातत्याने काम करत असताना जातीअंताच्या या चळवळीला गतिमान करण्यासाठी आपल्या सुशिक्षित मुलामुलीचे लग्न ( मंगल परिणय ) जाहीर पणे बौध्द संस्काराने केले या मंगल परिणयास महाराष्ट्रानतून शेकडो कार्येकर्ते उपस्थित होते.या ऐतहासीक क्षणास उपस्थित राहता आले पुज्य भिक्खू संघ व भारतीय बौध्द महासभा यांच्या द्वारे हा बौध्द विवाह संपन्न करण्यात आला.
मातंग समाज चलो बुध्द धम्म की ओर या अभियानाची प्रमुख दिवंगत जी.एस.दादा कांबळे यांनी या अभियानाची सुरुवात गेल्या दशकात सुरु केली.महाराष्ट्र व प्रामुख्याने मराठवाडा परिसरात बौध्द धम्म दिक्षा ग्रहण कार्यक्रम राबवुन जाती अंताचा लढा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष जी.एस.दादा कांबळे यांनी अतोनात मेहनत घेतली.आज परभणी नांदेड लातुर बीड जालना औरंगाबाद या परिसरात सुशिक्षित ,अभ्यासु व परिवर्तन वादी चळवळीत काम करणाऱ्या बुध्द फुले शाहु आंबेडकर पेरियार या तमाम समतावादी समाज सुधारकांच्या विचार धारेला अनुसरुन समतेसाठी कार्य करणाऱ्या कार्येकर्ते यांनी हे पाऊल उचलले आहे.बौध्द - मांग यांच्या तील भेद केवळ बौध्द धम्माने संपणार आहे बौध्द धम्माला जबरदस्तीने स्विकारणे हा आग्रह नसुन जर बौद्ध धम्माची शिकवण पूर्णतः पटली असेल तरच स्विकारणे हे महत्त्व पूर्ण आहे.* येणाऱ्या काळात महार-मांगात मुली मुलीचे लग्न होतील.त्याची सुरुवातही झाली आहे.नक्कीच *जाती व पोट जातीमधील हा सामाजिक भेद हा केवळ बौद्ध धम्माने संपणार आहे.आणि म्हणून या चांगल्या कार्यासाठी सर्वोत्परी सर्वांनी झटले पाहीजे...
शिंदे व पवार कुंटुंबाचे पुनश्च अभिनंदन...✍️
*भिक्खू पय्यानंद थेरो लातूर*
0 टिप्पण्या