🌟पुर्णा शहरातील इंडियन गॅस एजन्सी मालकाची मनमानी कारभारामुळे कामगार त्रस्त....!

                               


🌟गॅस एजन्सी मालक डिलिव्हरी चार्जेस देत नसल्यामुळे यासंदर्भात दि.२० जून रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन🌟 

पुर्णा (दि.२३ जुन २०२३) :- शहरातील इंडियन गॅस सिलेंडर वितरण करणारे कामगार (मॅन बॉय) गॅस एजन्सी मालक डिलिव्हरी चार्जेस देत नसल्यामुळे यासंदर्भात दि.२० जून २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले  शहरात तसेच तालुक्यात गॅस सिलेंडर  आपल्या ऑटो मध्ये वितर करत ग्राहकांना शहरातील इंडियन गॅस एजन्सी चे मालक श्री जी एम आहेर हे असून मागील वर्षा मध्ये डिसेंबर पर्यंत प्रति सिलेंडरला रुपये २० रुपये डिलिव्हरी चार्जेस इंडियन गॅस कंपनी कडून  देत होते परंतु  मागील काही महिन्यांपासून वीस रुपये प्रति सिलेंडर चार्जेस देणे परवडत नाही म्हणून डिलिव्हरी चार्जेस गॅस वितरण केलेल्या ग्राहका कडूनच घ्या असे सांगत आहे व  तालुक्यातील गावोगावी जाण्यासाठी गॅस सिलेंडर वाहनातून वितरतन करण्यासाठी  आटोला डिझेल सुद्धा देत नाहीत व मजुरी नाही तसेच प्रती सिलेंडर २० रुपये मिळत असेल व इतर अटी टाकून आम्हा कामगाराकडून शंभर रुपयांच्या  बोंड पेपरवर लेखी स्वरूपात लिहून घेतले  गॅस एजन्सीने यापूर्वी ग्राहकांना  शहरात व तालुक्यात लाऊड स्पीकर लावून अलाउन्समेंट करण्यात आली होती  की गॅस ग्राहकांनी पावतीपेक्षा जास्त पैसे देऊ नये डिलिव्हरी मॅन बॉयला कंपनीकडून प्रती सिलेंडर रुपये २९.६० रुपये देण्यात येत आहे असे जाहीर केल्यामुळे ग्राहकांना पावतीपेक्षा जास्त पैसे नाहीत व आमच्या वाहतूक करणाऱ्या ऑटोला डिझेल व मजुरी मिळत नसल्यामुळे आमच्यावर सहा महिन्यापासून उपासमारीची वेळ आली आहे.

पुर्णा गॅस एजन्सी मालक श्री.जी.एम आहेर त्यांचा मुलगा अरेरावी ची भाषा करत तुम्हाला काम करायचे असेल तर करा नाहीतर सोडून जा आम्ही कंपनीकडून पावती मध्ये समाविष्ट केलेली मजुरी तुम्हाला देऊ शकत नाही तुम्ही ग्राहकाकडून पावतीपेक्षा जास्त पैसे मजुरी म्हणून घ्या आम्ही तुम्हाला मजुरी देणार नाहीत असे  उद्धट बोलून धमकावत असल्यामुळे गॅस एजन्सी यांच्याकडे कंपनीकडून गॅस पावतीमध्ये समाविष्ट असलेली सिलेंडर वाटप मजुरी २९.६० प्रत सिलेंडर प्रमाणे आम्हाला मिळून द्यावी वाहनांना दररोज डिझेल देण्यात यावे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 27 जून रोजी संपावर जाण्याचा इशाराही निवेदनात नमूद केला आहे  त्यावेळी राजू रणशूर राजू गुंडे अनिल ढवळे इरफान शेख संतोष ठाकूर चंद्रमणी लोखंडे संतोष महाजन मुकिंद कदम उत्तम हातागळे प्रकाश वावळे आदीं कामगारांच्या स्वाक्षरी आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या