🌟जयंती महोत्सव सोहळ्यास शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
पुर्णा (दि.११ जुन २०२४) - पुर्णा शहरात काल शनिवार दि.१० जुन २०२३ रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा २९८ वा जयंती महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष गणेश कदम,पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रताप कदम,मनसे अध्यक्ष राज ठाकर, भगतसिंग ब्रिगेड अध्यक्ष कुंदन ठाकूर,प्रहार अपंग क्रांती संघटनेचे शहर अध्यक्ष किशोर सूर्यवंशी,शिवसेना नेते बालाजी वैद्य,आनंद बनसोडे,गोकुळ लोखंडे, जगन्नाथ रेनगडे ,लक्ष्मण वैद्य, प्रताप बकाल, संतोष पारडकर ,या मान्यवरांनी जयंती सोहळ्यात सहभाग नोंदविला.
यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्त समाजसेवक तथा प्रहार अपंग क्रांती संघटनाचे शहराध्यक्ष किशोर सुर्यवंशी यांच्या वतीने जयंती मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शाळांत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब गरजवंत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व जयंतीची भव्य मिरवणूक ढोल ताशा पथक व तसेच लहान बालक यांनी मर्दानी खेळ तलवारबाजी, भालाफेक, काठी ,दानपट्टे ,फिरवून पुर्णेकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले ही मिरवणूक कोळीवाडा येथील खंडोबा मंदिर मार्गे शिवाजी चौक, गुरु बुद्ध स्वामी मंदिर, जागीरदार चौक, मुख्य बाजारपेठ ,शिवाजी महाराज चौक ,बसवेश्वर चौक ,या मार्गाने संपन्न झाली या जयंती मंडळाचे मुख्य संयोजक विश्वनाथ होळकर ,नवनाथ रौंदळे, अशोक जडगे, मल्हारी हिरवे, केदार पिसाळ ,सोपान वाळवटे, सकाराम गाढवे ,श्याम कोमटवार ,जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते....
0 टिप्पण्या