🌟हिंगोली जिल्ह्यात कोठेही बाल कामगार आढळल्यास संबंधित मालकावर दंडात्मक व फौजदारी करण्यात येईल....!


🌟जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन🌟 

हिंगोली (दि.13 जुन 2023) : आज दि. 12 जून बाल कामगार विरोधी दिवसाचे औचित्य साधून बाल कामगार विरोधी जनजागृतीचा एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील सर्व हॉटेल धारक, विटभट्टी मालक, दुकाने, गॅरेज, बेकऱ्या, कत्तलखाने इतर छोट्यामोठ्या सर्व उद्योगातील मालकांना 14 वर्षाखालील बालकांना सर्वच व्यवसाय व प्रक्रियेमध्ये  काम करण्यास प्रतिबंध आहे. तसेच 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

 जिल्ह्यात कोठेही बाल कामगार आढळून आल्यास बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारित अधिनियम 2016 नुसार मालकास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान 20 हजार रुपये व कमाल 50 हजार रुपयापर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा मालकास होऊ शकतात. 


हिंगोली जिल्ह्यात कुठल्याही आस्थापनात अथवा कोणत्याही व्यवसायात बाल कामगार आढळल्यास आस्थापना मालकावर दंडात्मक कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच पालकांनीही अल्पशा मोबदल्यासाठी आपल्या पाल्याचे जीवन उद्ध्वस्त करुन नका, बालपण व शिक्षण हा त्यांचा हक्क असून त्यांना त्यापासून वंचित ठेवू नका. तसेच मालक, पालक, बालक यांनी ‘‘द्या बालकांना शिक्षण व ज्ञान, घडतील नागरिक उद्या सुजान’’ या म्हणीप्रमाणे बाल कामगार या अनिष्ट प्रथेच्या उच्चाटनासाठी शासनास मदत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या