🌟विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या मराठवाडा अध्यक्षपदी एन.आय.काळे यांची निवड....!


🌟तर विभागीय उपाध्यक्षपदी सहादु ठोंबरे,रवी पंडीत यांची निवड🌟

परभणी : सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे एन.आय.काळे यांची विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या मराठवाडा विभाग अध्यक्षपदीतर सहादु ठोंबरे आणि रवी पंडीत यांची विभागिय ऊपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.मालवण जि.सिधुदुर्ग येथे आयोजित विद्रोही चिंतन शिबिरात ही निवड घोषित करण्यात आली.विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी,कार्यकारी सचिव यशवंत मकरंद,प्रख्यात विचारवंत चंद्रकांत वानखेडे,किशोर ढमाले यांच्या हस्ते निवडपत्र प्रदान करण्यात आले.या वेळी विद्रोहीचे प्राचार्य डाॅ.विठ्ठल घुले,प्रा.डाॅ.सुरेश शेळके,परभणी  जिल्हाध्यक्ष डाॅ.सुनिल जाधव ऊपस्थित होते.

या निवडी बद्दल एन.आय.काळे,सहादु ठोंबरे,रवी पंडीत यांचे सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले.मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात कार्यकारिणी निवड अभियान राबविणार असल्याची भुमिका एन.आय.काळे यांनी घोषित केली.

आपला

*यशवंत मकरंद*

कार्यकारी सचिव

विद्रोही सांस्कृतिक चळवळ

महाराष्र्ट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या