🌟पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी संपन्न....!


🌟यावेळी एकादशी निमित्त फराळाचे वाटप देखील करण्यात आले🌟


पुर्णा (दि.२९ जुन २०२३) - पुर्णा तालुक्यांतील पुर्णा-ताडकळस मार्गावरील फुकटगाव येथे आज गुरुवार दि.२९ जुन २०२३ रोजी 'आषाढी एकादशी' निमित्त भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. 


आषाढी एकादशी  निमित्त फुकटगावात आयोजित भव्य पालखी व दिंडी सोहळ्यात आज गावातील भाविक भक्तांसह गावातील सर्व गावकरी,महिला,अबालवृध्दांसह सर्व शाळेतील मुले/मुलींनी देखील सहभाग नोंदवला टाळ मृदंगासह रामकृष्ण हरीच्या गजरात निघालेल्या या दिंडी/पालखी सोहळ्यात गावातील वारकरी भजनी मंडळ यांनी विना,टाळ मर्दंगाच्या निनादामध्ये विठुरायाच्या नामाचा जयघोस करत गावामध्ये सर्वत्र पालखी मिरवणूक काढली यावेळी सर्वाना एकादशी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले,व सर्व गावाकऱ्यांनी मिळून या कार्यक्रमासाठी सहकार्य केले....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या