🌟परभणी जिल्ह्यातील अनुदानास पात्र शाळांकडून प्रस्ताव आमंत्रित....!


🌟जिल्ह्यातील पात्र शाळांनी ३० जून पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावे - जिल्हाधिकारी आंचल गोयल 

परभणी (दि.08 जुन 2023) : अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित,विना अनुदानित,कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सन २०२३-२४ वर्षासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.जिल्हा प्रशासनाकडून अनुदानास पात्र शाळांची शिफारस शासनाकडे करण्यात येणार असून, पात्र शाळांनी ३० जून २०२३ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.

सन २०२३-२४ अन्वये योजनेंतर्गत पात्र शाळांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र शाळांची अल्पसंख्यांक विकास विभागाच्या ७ ऑक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार विहीत निकषानुसार तपासणी करेल व त्या पात्र प्रस्तावाची शासनाकडे शिफारस करेल.  

त्यामुळे इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३० जून २०२३ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. त्यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त प्रस्तावांची छाननी करेल व त्रुटीची पूर्तता करून अंतिमरित्या पात्र प्रस्ताव दिनांक ३१ जुलै,२०२३ पर्यंत शासनाकडे सादर करणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या