🌟अष्टांगिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था च्या वतीने नशा मुक्त भारत पंधरवाडा कार्यक्रम संपन्न....!


🌟परभणी जिल्ह्यात दि.१२ जुन ते २६ जून दरम्यान  विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन🌟

नशामुक्त भारत पंधरवड्यानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ते २६ जूनदरम्यान परभणी जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


नशामुक्त भारत पंधरवड्यानिमित्त आज सोमवार 19 जून रोजी परभणी शहरातील भैया साहेब आंबेडकर नगर तसेच संत कबीर नगर, अजिंठा नगर, करीम नगर वांगी रोड येथे अष्टांगिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेखाताई आवटे  यांच्या वतीने शाहीर कलावंत काशीनाथ उबाळे  यांच्या संचच्या वतीने गायनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीपर गीत सादर करून सिगारेट ओढणे , दारू पिणे , मावा सुगंधी तंबाखू गुटखा इत्यादींमुळे दात घसा फुफुसे हृदय जठर मूत्रपिंडे तसेच  श्वसनसंस्था यांचे विकार होणे कर्करोग आणि इतर भयंकर रोग होतात या बाबत जनजागृती केली आहे हा कार्यक्रम जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला  या कार्यक्रमास अष्टांगिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष रेखाताई आवटे, सुनिता कापसे, लक्ष्मीबाई गायकवाड, आशाबाई कांबळे, लताबाई कठाळे, सुनीता गायकवाड, संगीता ढाले, कमलबाई भिसे, बालामती गायकवाड, चंद्रकला जाधव, रोहित कापसे, राहुल रणवीर, प्रकाश कांबळे, बालु ढगे, राहुल बागडी, पंडित पवार, विष्णू कापसे, आदींसह महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि भैय्यासाहेब आंबेडकर नगर येथील युवक महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या