🌟महाराष्ट्र विधान परिषद गटनेता प्रविण दरेकर यांचा नांदेड दौरा....!


🌟श्री.सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा येथे जावून दर्शन घेणार🌟

नांदेड, (दि. 09 जुन 2023) :- महाराष्ट्र विधान परिषद गटनेता प्रविण दरेकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील शुक्रवार 9 जून 2023 रोजी नरखेड ता. मोहोळ जि. सोलापूर येथून मोटारीने सायं. 7 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड  येथे आगमन, राखीव व मुक्काम.शनिवार 10 जून 2023 रोजी दुपारी 4.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सायं. 4.30 वा. श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन व गृहमंत्री अमित शाह यांच्या आमगन प्रसंगी उपस्थिती. सायं. 5.10 वा. श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथून श्री.सचखंड हुजूर साहेब गुरुद्वाराकडे मोटारीने प्रयाण. सायं. 5.25 वा. सचखंड हुजूर  साहेब गुरुद्वारा नांदेड येथे आगमन व दर्शन. सायं.5.40 वा. सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेड येथून अबचलनगर ग्राऊंड नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सायं. 5.50 वा. अबचलनगर ग्राऊंड नांदेड येथे आगमन व सभेस उपस्थिती. सायं. 7.15 वा. अबचलनगर ग्राऊंड नांदेड येथून सोमेश कॉलनी कलामंदिर नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सायं. 7.25 वा. श्री. राजेंद्र हुरणे (व्यापारी असोसिएशन आघाडी) यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. (स्थळ- सोमेश कॉलनी कलामंदिर नांदेड). सायं. 7.35 वा. सोमेश कॉलनी कलामंदिर, नांदेड येथून वसंत नगर नांदेडकडे मोटारीने प्रयाण. सायं. 7.45 वा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. स्थळ:- साई सुभाष वसंतनगर नांदेड . सायं. 7.55 वा. वसंत नगर नांदेड येथून श्री. गुरु  गोविंदसिंघजी विमानतळ नांदेडकडे मोटारीने प्रयाण. रात्री. 8.05 वा. श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन व गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रस्तानसमयी उपस्थिती. रात्री 8.30 वा. श्री. गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथून औरंगाबाद कडे मोटारीने प्रयाण.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या