🌟पुर्णेतील निर्माणाधिन रेल्वे उड्डान पुलालगतचा पर्यायी रस्ता बनला साक्षात मृत्यू मार्ग...!


🌟महारेलच्या वरिष्ट अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : एमआरआयडीसीचे कनिष्ठ अभियंता भुषण गिरीचे सब गुत्तेदाराशी हितसंबध ?🌟   


पुर्णा (दि.२६ जुन २०२३) - पुर्णा-नांदेड लोहमार्गावरील नांदेड-हिगोली गेट परिसरातील निर्मानाधिन रेल्वे उड्डाण पुलाला लागलेली साडेसातीचा पर्वकाळ संपता संपत नसून मागील सन २७ आगष्ट २०१९ मध्ये सुरु झालेल्या या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला येत्या २७ आगष्ट २०२३ रोजी चार वर्षाचा कालावधी पुर्ण होत असून सदरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर असतांनाच गॅलकॉन इन्फ्रॉस्टक्चर प्रा.लि.या कंपनीचे कामावरील प्रकल्प व्यवस्थापक त्यागराजन परशुराम यांच्यावर स्थानिक गुत्तेदार शेख अतिख शेख बशीर व त्यांच्या तिन सहकार्यांनी दि.०३ जुन २०२३ रोजी अत्यंत अमानुषपणे जिवघेणा हल्ला केल्याची घटना घडली त्यामुळे या प्रकल्पावर काम करणारे परप्रातिय अधिकारी/कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावर निर्माण झाल्यामुळे या कामाला पुन्हा कासवगती प्राप्त झाली त्यातच या रेल्वे उड्डाणपूला लगतचा रहदारीचा पर्यायी रस्ता अर्धवट व निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे वाहन धारक प्रवासी वर्गासाठी धोकादायक झाला सदरील रस्त्याचे काम महारेल (एमआरआयडीसी) कडून सब गुत्तेदार शेख अतिख यांना देण्यात आले या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्यामुळे रस्त्याला अवघ्या दिड महिन्याच्या काळात मोठमोठे तडे गेले व रस्ता मात्र अपुर्णच झाला रस्त्याच्या सुरुवातीला लोखंडी रॉड मोकळे झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी वाहनांना अडकून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


या रस्त्या संदर्भात मागील महिन्याच्या काळात काही पत्रकारांनी विचारपूस केली असता संबंधित पत्रकारांना त्या रस्त्याचे काम करणाऱ्या सब गुत्तेदारांनी आडमुट्टीची भाषा करून त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रकारही केला होता नंतर या सब गुत्तेदाराने उडान फुलाच्या प्रकल्प व्यवस्थापकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली या प्रकरणी त्या सब गुतेदारावर पुर्णा पोलीस स्थानकात गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर या रस्त्याचे काम अधांतरीतच राहिले त्यामुळे पावसाळा सुरू झाल्याने हा रस्ता वाहन चालकासाठी अक्षरशः मृत्यू मार्गच होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा रस्ता २६० मिटर असून या पैकी ५० टक्के रस्ता देखील पुर्ण झालेला नसून लाखों रुपयांच्या या रस्त्यांची धुळधान झाल्याचे दिसत आहे त्यामुळे महारेलच्या शासकीय विकास निधीची संबंधित गुत्तेदाराने अक्षरशः वाट लावल्याचे दिसत  दिसत असून प्रकल्प अंतर्गत तब्बल दोन किलोमीटर सर्विस रोडची मान्यता असून त्याची अंदाजी किंमत ०२ करोड ५० लाख इतकी असून यातील उड्डाण पुलाजवळचा पर्यायी रस्ता उडान पुलाच्या दोन्ही बाजूने २६० मिटर असून या रोडचे अंदाजीत किंमत २५ ते ३० लाख रुपये असल्याचे एमआरआयडीसी चे कनिष्ठ अभियंता भूषण गिरी यांचे म्हणणे आहे सदरील रस्ता सब गुत्तेदार शेख आतिक शेख बशीर यांना देण्यात आला असून यातील यातील केवळ १०८ मिटर रस्ता बनवण्यात आला असून तोही अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून त्या रस्त्याला अल्पशा कालावधीमध्ये अक्षरशा तडे गेल्याचे दिसत आहे त्यामुळे महारेल एमआरआयडीसीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने हा रस्ता वाहन चालक प्रवाह चालक प्रवाशांसाठी मृत्यू मार्ग होत असल्याने भविष्यात फार मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या