🌟परतूर तालुक्यातील आष्टी पोलिस स्थानकाच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यास गेलेल्या पथकावर जुगारड्यांचा हल्ला..!


🌟तालुक्यातील रंगोपंत टाकळीतील घटना : जुगारड्यांच्या हल्ल्यात ३ पोलिस कर्मचारी जखमी🌟 

परतुर : तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंगोपंत टाकळी येथे हायप्रोफाईल जुगार अड्डा चालत असल्याची कुणकूण प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक चैतन्य कदम यांच्या कानापर्यंत आल्यामुळे त्यांनी बुधवार दि.०७ जुन २०२३ रोजी ०८-०० वाजेच्या सुमारास आपल्या पथकासह दाखल होऊन धाड टाकली यावेळी झन्ना मन्ना खेळणाऱ्या जुगारड्यांनी छापा टाकायला आलेल्या पोलिस पथकावरच हल्ला केल्याचा गंभीर प्रकार घड़ल्यामुळे पोलिस प्रशासनात खळबळ माजली असून जुगारड्यांनी केलेल्या हल्ल्यात ३ कर्मचारी जखमी झाले आहेत.

या अगोदर देखील प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक चैतन्य कदम यांच्या पथकाने परतवा्डी तांडा परिसरातील एका हॉटेल मध्ये चालणाऱ्या हॉयप्रोफाईल जुगार अड्झ्यावर छापा मारुन तब्बल २३ जुगारड्यांना अटक केली होती यावेळी त्याच्याकडून १९,१५,३४०/ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता दरम्यान ही कारवाई होती न होती की या नंतर त्यांच्या पथकाने रंगोपंत टाकळीतील जुगार अड्ड्यावर धाड टाकण्याची कारवाईत केली या कारवाई वेळी मात्र जुगारड्यांनी पोलिस पथकावरच हात उचलण्याची हिंमत केल्याने आष्टी पोलिस स्थानका अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून गुन्हेगारांची हिंमत कमालीची वाढल्याचा निदर्शनास येत आहे. परतुर तालुक्यातील आष्टी पोलिस स्थानकाच्या हद्दीत मागील काही काळापासून अवैध देशी/विदेशी दारू विक्रीसह अन्य अवैध धंद्याविरोधात विशेष मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. त्यातर्गत मा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोमनाथ नरके कर्मचारी दिपक सोनुने, रानोजी पांढरे, सज्जन काकड़े हे रंगोपंत टाकळी येथे कांहीं लोक जुगार खेळत असल्याच्या माहिती ठिकाणी बुधवारी रात्री ०८:०० वाजता जाऊन छापा टाकला. त्यांचा राग आल्याने जुगाऱ्यांनी या पोलिस पथकावरच हल्ला चढविला. पोलिसास झालेल्या हाणामारीत वरील ३ पोलिस कर्मचारी जखमी आहेत.या हल्ल्यात आष्टी पोलीस कर्मचारी दिपक सोनुने, रानोजी पांढरे, सज्जन काकड़े यांना गंभीर दुखापत झाली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या