🌟पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी व प्रथमोपचार करण्याचे उल्लेखनीय कार्य🌟
परभणी (दि.१५ जुन २०२३) - आषाढी एकादशी निमित्त विविध जिल्ह्यातील पायी वारी करणाऱ्या अनेक दिंडी व पालखी परभणी शहरातून जात आहेत. त्यातील काही दिंड्यातील वारकऱ्यांची वेगवेगळ्या मार्गाने सेवा करण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केले जात आहे.
काल दि. १४ जून २०२३ रोजी अश्याच एका श्रीक्षेत्र संस्थान, पिंपलदरी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी व प्रथमोपचार करण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व परभणी शहर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. परभणी शहरातील खानापूर फाटा येथील आनंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मुक्कामी असलेल्या या दिंडीच्या मुकामाची व फराळाची सोय यजमान हरिभाऊ गिरी यांनी केली होती.
या आरोग्य तपासणी व प्रथोमोपचार कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, वैभव संघई, अंकुश गिरी, रामेश्वर पुरी, ॲड सुवर्णाताई देशमुख, सुषमाताई देशपांडे बालाजी मगर, विष्णु घोडके, अनिल जाधव, ज्ञानेश़्वर गिरी, अनिल शेलके, निलेश शेळके उपस्थित होते.परभणी शहर महानगर पालिका आरोग्य विभागाचे डॉ. श्वेताली मुंजे, डॉ. मृण्मयी मोरे, वर्षा श्रीमंगले, गणेश सोलेये, अंकिता दुनघव, जयश्री गुंगे, धापासे मामा, फाजल मिर अली आली व खानापूर येथील सर्व आठ आशा वर्कर यांनी उत्तम आरोग्य सुविधा पुरविली.......
0 टिप्पण्या