🌟पुर्णेत ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांचा शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर निषेध....!


🌟खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला शिवसेना शिंदे गटाने भर चौकात हाणले जोडे🌟 


पुर्णा (दि.०३ जुन २०२३) :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव तथा कल्याण-डोंबीवली लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित करताच अत्यंत तुच्छ भावनेने भर पत्रकार परिषद सुरू असताना खा.संजय राऊत यांनी थुंकण्याचा अशोभनीय गभीर प्रकार केल्यामुळे त्यांच्या या बेताल कृत्याच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून राज्यात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उंमटत असून या घटनेच्या निषेधार्थ आज शनिवार दि.०३ जुन २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजता पुर्णा शहरातही शिवसेना शिंदे गटाचे परभणी जिल्हाप्रमुख माधवराव कदम यांच्या नेतृत्वाखाली संघटित झालेल्या असंख्य शिवसेना शिंदे गटाच्या  पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शहरातील शिवतीर्थ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेवर अक्षरशः जोड्यांचा वर्षाव करीत तिव्र आंदोलन केले यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत मुर्दाबादच्या देखील गगनभेदी घोषणा दिल्या त्यावेळी विधानसभा प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाप्रमुख एकनाथराव काळबांडे तालुकाप्रमुख प्रकाशराव काळबांडे शहरप्रमुख विशाल किरडे युवाशहर प्रमुख अंकित कदम उपशहरप्रमुख लक्ष्मण कदम, गजानन कदम सतीश कदम अविनाश रेंगे गोपाळ बोबडे बंटी बोबडे संतोष खंदारे महिला तालुकाप्रमुख संगीता पुरी, गीता बायास मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या