🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟शिवसेना नेते खा संजय राऊत व त्यांचे बंधु आमदार सुनील राऊत यांना पण देण्यात आली धमकी🌟

✍️ मोहन चौकेकर

* राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी ; राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट ; धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा फेसबुकवर उल्लेख ; धमक्या देऊन माझा आवाज कोणी बंद करु शकत नाही --- शरद पवार;शरद पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल -- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

* आयआयसीए आणि नलसर विद्यापीठाने 'नादारी आणि दिवाळखोरी' कायद्यात एल.एल.एम अभ्यासक्रम केला सुरू; पीआयबीची माहीती

 * 2,000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण: आरबीआयच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर SC ने तातडीची सुनावणी करण्यास दिला नकार

* शरद पवारांना धमकी आलेल्या ट्विटर हॅण्डलची चौकशी करून त्यावर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिस प्रशासनास आदेश 

* कोळसा मंत्रालयाने 22 कोळसा खाणींसाठी खाणकाम अधिकार आदेश केले जारी, कोळशाचा एकत्रित साठा 6379.78 दशलक्ष टन इतका

* शिवसेना नेते खा संजय राऊत व त्यांचे बंधु आमदार सुनील राऊत यांना पण देण्यात आली धमकी ; संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक 

* मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती

* आज आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन, नवी दिल्लीत "हमारी भाषा, हमारी विरासत" प्रदर्शनाचं आयोजन

* चांद्रयान ३ ही भारताची मोहीम जुलैच्या मध्यापर्यंत पूर्णत्वाला जाईल - एस सोमनाथ

* वातावरण खराब करण्याचा प्रयत्न : बीड जिल्ह्यातील तरुणाकडून सोशल मीडियावर औरंगजेबाचे फोटो, गुन्हा दाखल; आष्टी शहर बंदची हाक

* एसटीचे स्टेअरींग आता महिलांच्या हाती, अर्चना आत्राम ठरल्या पहिल्या महिला बस चालक

* एमएचटी सीईटी चा निकाल 12 जून दिवशी सकाळी 11 वाजता; cetcell.mahacet.org वर पहाता येईल निकाल 

* झारखंडच्या धनबादमध्ये बेकायदेशीर कोळसा खाणीत ढिगारा कोसळला;  3 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी, काही जण अडकल्याची भीती

* लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू, EC ने भारतभर EVM, पेपरट्रेल मशीनची प्रथम स्तर तपासणीस केली सुरुवात.

* कोची विमानतळावर मलेशियाहून आलेल्या 4 प्रवाशांकडून 1,21,83,965 रुपये किंमतीचे 2207.24 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त, एअर इंटेलिजेंस युनिटची कारवाई.

* भाजपने 48 लोकसभा मतदारसंघ व 288 विधानसभा मतदारसंघासाठी केल्या मतदारसंघ प्रमुखांच्या नियुक्त्या , शिंदे गटात खळबळ. 

* समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, एकाच कुटुंबात तिघांचा मृत्यू.

 * येत्या ५ दिवस सूर्य महाराष्ट्रात आग 🔥 ओकणार,  अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून तीव्र उष्णतेचा इशारा

* मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी माजी मंत्री डॉ.वर्षा गायकवाड

आमदार वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड. याआधी भाई जगताप यांच्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्षपद होतं. 

वर्षा गायकवाड धारावीमधून चारवेळा निवडून आल्या आहेत. 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारकी लढवली होती.

* राणे बंधूवर बंदी आणा -- संजय काकडे

राणे बंधुवर पक्षाने बंदी घालावी अशा वक्तव्याने पक्षाचीच प्रतिमा मलिन होत आहे भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचा पक्षाला घरचा आहेर

 * तर मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा भाजपला इशारा कल्याण लोकसभा कुणाची ?; हा भाजप-शिंदेंच्या शिवसेनेतला वाद पेटला.

* मनसेचे वसंत मोरे लोकसभा लढविणार :-

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आदेश दिले तर पुणे लोकसभा पोटनिवडणूक आणि आगामी लोकसभा निवडणूक लढवणार, आणि 100% जिंकणार, असा विश्वास मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केला.

*शेअर बाजार: सेन्सेक्समध्ये 223.01 अंकांची घसरण होऊन 62,625.63 अंकांवर बंद, तर निफ्टी 71.15 अंकांची घसरण होऊन 18,563.40 अंकांवर बंद

* बंगळुरूत 1344 गुंडांविरोधात कारवाई: कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये दंगेखोरांच्या घरांवर छापे, यावेळी 9.1 किलो गांजा, काही हत्यारे आणि 16 वाहने पोलीसांकडून जप्त 

* शिवछत्रपतींचा 41 फुटांचा पुतळा: नागपुरात शिवछत्रपतींचा सिंहासनारूढ 41 फुटांचा पुतळा बसवला जाणार; येत्या 18 जून रोजी या पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा पार पडणार

* भारतात 10 कोटी मधुमेहाचे रुग्ण: भारतात 2019 मध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या 7 कोटी होती, ती आता झाली 10 कोटी, केवळ 4 वर्षांत 4 कोटी भारतीयांना मधुमेह-ICMR ची माहीती

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55600 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 60650 रुपये 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या