🌟परभणी जिल्ह्यात महामंडळाच्या योजनांच्या माहिती बाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्र.....!


🌟कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो खंदारे यांनी दिली माहिती🌟

परभणी (दि.०८ जुन २०२३) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमार्फत जिल्ह्यातील बेरोजगार युवक-यवतींसाठी शुक्रवार (दि.९) रोजी दुपारी १२ वाजता संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात देण्यात येणार आहे. या ऑनलाईन होणाऱ्या मार्गदर्शन सत्रास महामंडळाचे निरीक्षक बालाजी कदम हे माहिती देणार असल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो खंदारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

या ऑनलाईन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी https://meet.google.com/hxk-nsoy-bbp या लिंकवर क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप (Google meet app) इन्स्टॉल करून घ्यावे. या ॲपवरून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉईन वर क्लिक करून १० मिनिटांपूर्वी जॉईन व्हावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला video व mice mute बंद करावा. सत्राच्या शेवटी प्रश्न विचारावेत.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या