🌟चोरी संशया वरुण जरीन खानचा पोलीस कस्टडीत खुन तर मग परळी पोलिसांनी त्यांनाही अटक करण्याची हिम्मत दाखवावी...!


🌟भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या मुंडे बंधू/भगिनीला परळी पोलीस चौकशीसाठी बोलावून अटक करतील काय ? - सर्वजीत बनसोडे


परळी (दि.२७ जुन २०२३) - चोरीच्या आरोपात जर जरीन खानला पोलीस कस्टडीत आणून मारहाण केली जात असेल तर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या आ.धनंजय मुंडे व पंकाजाताई मुंडे यांनाही परळी पोलीस चौकशीसाठी बोलावून अटक करण्याची हिम्मत दाखवणार  का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांनी केला. ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी बोलत होते. 

    काल दिनांक 26 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्या संदर्भात परळी उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा पक्षाचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. तर मोर्चाला मार्गदर्शक म्हणून तर जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, जिल्हा युवा अध्यक्ष बाबुराव मस्के हे उपस्थित होते.

    यावेळी पुढे बोलताना सर्वजीत बनसोडे म्हणाले की, आर्टिकल 20(3) नुसार पोलीस कोणत्याही अपराध्यास स्वतः विरुद्ध साक्षी देण्यास जबरदस्ती करू शकत नाहीत. फारुख अहमद म्हणाले की, आमदार धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांना महापुरुषांचे विचार झोपणार नाहीत म्हणून या दोघांनीही गोपीनाथराव मुंडे यांचा तरी आदर्श घ्यावा गोरगरिबांना त्रास देणाऱ्या मस्तवाल माजुरी लोकांची पाठराखण करण्यापेक्षा भले ते आपल्या स्वजातीचे जरी असले तरी आरोपींना शासन झाले पाहिजे ही भूमिका घ्यावी व दलीत आणि मुस्लिमांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे तर मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी आरोप केला की, ज्यांच्यामुळे आपण सत्तेच्या खुर्चीत बसला आहात त्या दलित, मुस्लिमांच्या कुटुंबांना साधे सांत्वनपर भेट देत नाहीत हा हा जातीयवाद नाही का. याला काय समजावे? याप्रसंगी शैलेश कांबळे, मिलिंद घाडगे, बिभीषण चाटे, गफार खान यांचीही भाषणे झाली.

   या मोर्चाला संभाजी ब्रिगेडचे देवराव लुगडे, एम आय एम चे शेख शरीफ, काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख दीपक शिरसाठ यांनी जाहीर पाठिंबा देऊन विचार व्यक्त केले. हा मोर्चा गौतम साळवे, गफार खान, राजेश सरोदे, प्रेम जगतकर, प्रशांत उघडे बाबासाहेब मस्के यांच्या आयोजनात निघाला. मोर्चात जिल्हा पदाधिकारी एडवोकेट संजय रोडे, बालासाहेब जगतकर, प्रसेनजीत रोडे, गौतम आगळे, भारत तांगडे अंकुशराव जाधव, सचिन उजगरे, अण्णा मस्के बालाजी जगतकर, पुरुषोत्तम वीर, अक्षय बुंभे, परमेश्वर लांडगे, परमेश्वर जोगदंड, संजय गवळी साहेब रोडे अमोल हातागळे अनिल कांबळे मारुती सरोदे रामराजे सरवदे धम्मा कासारे राहुल कासारे सुशांत धावरे उपस्थित होते.

   हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी राजू भुतके, अविनाश मुंडे , ज्ञानेश्वर  गीते, विनोद रोडे, संदीप ताटे, एजाज खान, नंदकुमार सावंत, अशोक शेप, विजय झिंजुर्डे, भावेश कांबळे, युनूस भाई, धम्मानंद शिरसागर, सिध्दोधन आचार्य, बाळासाहेब किरवले, भीमराव कस्बे, बळीराम पारसे, धर्मा मेंडके, सुभम सावंत, प्रथमेश मस्के रोहन जगतकर चेतन ताटे वैजनाथ निरमले, तोफिक शेख खाजाभाई न्यूज भाई फिरोज खान तफिक शेख मुख्तार भाई अरेब सय्यद मुस्किन पठाण साजिद खान फैयाज कुरेशी इब्राहिम पठाण करीम शेख ताजु पठाण तालीम सय्यद सय्यद रशीद सय्यद हसन शारीरिक सय्यद मुनीर शेख खाजा शेख नाझीम शेख शौकत शेख अजम पठाण बिलाल खान मजर खान हबीब शेख चांद शेख रजाक शेख तयार मेहमूद सय्यद एजाज शेख अनवर शेख अहमदनगर वाहेद शेख फैसल खान इज मॉम शेख निखिल गोदाम श्याम ताटे रामेश्वर ताटे जालिंदर केदार, हरिभाऊ कांबळे.संतोष वावळे, सचिन रोडे, सोनू केदारे, राहुल बचाटे आदींनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या