🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे सोमवार दि.१९ जुन रोजी आयोजन....!


🌟जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला लोकशाही दिनाचे सकाळी अकरा वाजता आयोजन🌟 


परभणी (दि.१७ जुन २०२३) : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने, समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, या हेतूने  सोमवार दि.१९ जून २०२३ रोजी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा महिला लोकशाही दिनाचे सकाळी ११-०० वाजता आयोजन करण्यात आले आहे. 

 जिल्हा महिला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजन करण्यात येते. तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिनाचे प्रत्येक तहसील कार्यालयात महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजन करण्यात येते.   

* अर्ज स्वीकृतीचे निकष :-

   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे दोन प्रतीत सादर करावेत, प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, सेवा व आस्थापनाविषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत. महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु इच्छिणाऱ्या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित  जिल्हा माहिती व बाल  विकास अधिकारी कार्यालय परभणी येथे दाखल करण्याचे आवाहन जिल्हा माहिती व बाल  विकास अधिकारी कैलास तिडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या