🌟परभणी जिल्हा पोलिस दलाचे नागरिकांना आवाहन : अफवांवर विश्‍वास ठेवू नका : अश्या लोकांवर सायबर सेलची करडी नजर...!


🌟कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो,मजकूर सोशल मिडीयावर पोस्ट करु नका🌟 

परभणी (दि.११ जुन २०२३) : कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो, मजकूर सोशल मिडीयावर पोस्ट करु नयेत. अशा प्रकारच्या कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशा व्यक्तींविरुध्द कडक आणि कठोर कारवाई केली जाईल, असे परभणी जिल्हा पोलिस दलाने म्हटले आहे.

             फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम किंवा ट्वीटरवर कोणत्याही प्रकारचा भावना दुखावतील असा मजकूर पोस्ट करु नये, कोणीही अफवा पसरवू नये, अफवांवर विश्‍वास ठेवू नये, जातीय सलोखा कसा राखला जाईल, या दृष्टीकोनातून सहकार्य करावे. कुठल्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होवू नये, अन्यथा संबंधितांविरुध्द कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परभणी पोलिस दलाने दिला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या