🌟पुर्णेतील बुद्ध विहार येथे ज्येष्ठ पौर्णिमे निमित्त धम्म देशना व सत्कार समारंभाचे आयोजन...!


🌟भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो व भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन🌟

पुर्णा (दि.०१ जुन २०२३) - पुर्णा शहरातील बुद्ध विहार या ठिकाणी दि.०४ जून २०२३ रोजी जाहीर धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन अखिल भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो व भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

शहरातील बुध्द विहारात रविवार दि.०४ जून २०२३ रोजी सकाळी ०५-३० वाजेच्या सुमारास रत्न वंदना पुजा पाठ परित्राण व सूत्र पठण होणार आहे तर दुपारी १२-३० वाजता भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो व भदंत पायावांश यांची प्रमुख धम्मदेशना होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती म्हणून पी.बी.अंबोरे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक औरंगाबाद सुधाकर निकाळजे  संस्थापक अध्यक्ष जय भीम सेना महाराष्ट्र राज्य,रमण तेलगोटे जिल्हा महिला बालकल्याण विकास अधिकारी वर्ग-२,बी.के.आदमाने निवृत्त कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद. डॉक्टर अपेक्षा बालचंद थोरात वरील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आपण बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक समिती व बुद्ध विहार पुर्णा भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा पूर्णा व धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या