🌟पुर्णा बसस्थानकात हयातनगर मार्गे पुर्णा-लोहा बससेवा तब्बल दहा वर्षाच्या कालावधी नंतर सुरू....!


🌟पुर्णेतील अक्षरशः भुत बंगल्यात रुपांतरीत झालेल्या बस स्थानकाला 'अच्छे दिन' येण्याला हळुवारपणे सुरवात ?🌟

पुर्णा (दि.१९ जुन २०२३) - पुर्णेतील अक्षरशः भुत बंगल्यात रुपांतरीत झालेल्या बस स्थानकाला 'अच्छे दिन' येण्याला हळुवारपणे सुरवात झाली की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून पुर्णा तालुक्यात गेल्या दहा वर्षापासून हयातनगर मार्गे वसमत बस सेवा संपूर्णतः बंद होती सदरील मार्गावर बस सेवा बंद असल्यामुळे नागरिकांसह शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनींचे देखील अतोनात हाल होत होते या मार्गावर बस सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांतून जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. 

पुर्णा बसस्थानकात आज सोमवार दि.१९ जून २०२३ रोजी दुपारी ०२-०० वाजता वसमत डेपोची बस हयातनगर मार्गे आव्हई-सुहागन-बरबडी-पुर्णा-भाटेगाव-धनगर टाकळी-पारवा-लोहा मार्गे धावण्यास सुरूवात झाली असून या बस सेवेच्या दोन फेऱ्या होणार आहेत सकाळी ०७-३० वाजेला बस वसमत डेपोतून निघणार आहे लोह्याला पोहोचणार आहे लोह्याहून १०-३० वाजता वापस वसमत मार्गे बस येणार आहे त्यामुळे बसच्या दोन फेऱ्या होणार असून बस सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांमध्ये महिलांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झाले असून वसमत डेपोचे प्रमुख किसनराव कराळे पारवेकर यांनी बस सुरू केल्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आज बस स्वागत येथे दोन वाजता आले असता बसचे स्वागत नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले वाहक सचिन गरुड व चालक एस पी धुतमल यांचे सुद्धा हार घालून स्वागत केले यावेळी पुर्णा पत्रकार संघाचे अध्यक्ष दौलत भोसले  संभाजी भोसले एकनाथ भोसले लक्ष्मण भोसले दिगंबर भोसले लक्ष्मण भोसले आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या