🌟मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी पंकज अंबेगावकर यांची निवड....!


🌟तर नारायण भिसे यांची उप सभापती निवड🌟

 मानवत (दि.२७ जुन २०२३) :  येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी पंकज अंबेगावकर व उपसभापती पदी नारायण भिसे यांची काल मंगळवार दि.२७ जुन २०२३ रोजी संचालक मंडळाच्या विशेष सभेतून बिनविरोध निवड करण्यात आली.

            या बाजार समितीत अंबेगावकर गटाने १८ पैकी १० जागा पटकावल्या. तर विरोधी महाविकास आघाडीच्या गटाने केवळ ०७ जागा पटकावल्या. त्यामुळे या समितीवर अंबेगावकर गटाचेच प्राबल्य राहणार हे स्पष्ट झाले होते. दरम्यान, संचालक मंडळाच्या निवडणूकांपाठोपाठ अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता मंगळवारी नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा आयोजित करण्यात आली. त्या सभेतून पंकज अंबेगावकर यांचा सभापती पदासाठी तर नारायण भिसे यांचा उप सभापती पदाकरीता एकमेव अर्ज दाखल झाला. या सभेस विरोधी पक्षातील एकाही सदस्याने हजेरी लावली नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक, नुरसत शेख यांनी या दोघांच्या बिनविरोधी निवड झाल्याचे जाहीर केले.

            दरम्यान, या निवडणूकीमध्ये माजी आमदार मोहन फड यांच्यासह अन्य समर्थकांनी आंबेगावकर यांचे कौतूक केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या