🌟उपविभागीय अधिकाऱ्यांनी रेती/माती तस्करी विरोधात कारवाई सत्र सुरु करताच पुर्णा तालुका महसुल प्रशासन झाले जागे....!


🌟पुर्णेचे तहसिलदार बोथीकरांनी पदभार स्विकारल्याच्या तिन महिन्याच्या कालावधीत केवळ दुसरे कारवाईनाट्य ?   

    


     
पुर्णा (दि.११ जुन २०२३) - संपूर्ण परभणी जिल्ह्यात अवैध गौण खनिज रेती/माती/मुरुमासह दगड खदान खडी आदींच्या अवैध उत्खनन व अवैध तस्करीत आघाडीवर असलेला तालुका म्हणून पुर्णा तालुक्याची संंपूर्ण मराठवाड्यासह विदर्भ तसेच शेजारील कर्नाटक राज्यात देखील पुर्णा तालुक्याने आपली ओळख निर्माण केली आहे पुर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतून रात्रंदिवस प्रचंड प्रमाणात अवैध रेतीसह मातीचे देखील उत्खनन होत असातांना स्थानिक तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्यासह महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी बघ्याची भुमीका घेत नदीपात्र लुटणाऱ्या गौण खनिज लुटारुंना सातत्याने नदीपात्र वरबडण्याची सुवर्णसंधी देत असल्याचे निदर्शनास येत होते परंतु गंगाखेड उपविभागीय अधिकारी पदभार जीवराज डापकर यांनी स्विकारताच अवैध गौण खनिज रेती/माती/मुरुम/दगड खडी तस्करी विरोधात धडक मोहीमेस सुरुवात केल्यामुळे पुर्णेचे तहसिलदार बोधीकर यांच्यासह महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी देखील अचानक झोपेतून खडखडून जागे झाले की काय ? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या कारवाई नाट्यास पुर्णा तालुक्यात सुरुवात झाल्याचे दिसत आहे.


 

पुर्णा तालुक्यातील संदलापुर कातनेश्वर पिंपळगाव बाळापुर आणि कानखेड शिवारात आज रविवार दि.११ जून २०२३ रोजी सकाळी ०७:३० वाजेच्या सुमारास पूर्णा तहसील कार्यालयातील महसूल प्रशासनाच्या पथकाने छापेमारी करीत ०२ टिप्पर व ०१ ट्रॅक्टर रेती तसेच ०२ हायवा रेती मातीसह अवैधरित्या उत्खलन करून या चोरट्या शासकीय गौण खनिजाची तस्करी करीतांंना आढळून आल्याने ताब्यात घेऊन या वाहनांना ४ लाख रुपयांचा दंड थोटावण्यात आल्याची कारवाई करण्यात आल्यामुळे तहसिलदार बोथीकरांनी पदभार स्विकारल्यानंतर ही एकमेव मोठी कारवाई असल्याचे दिसत आहे.

परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल अप्पर जिल्हाधिकारी तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्णा महसूलच्या पथकाने मोजक्या ठिकाणी छापे टाकून दंडात्मक कारवाई लावण्यात आला आहे पूर्णा तालुक्यातील सदलापूर कातनेश्वर पिंपळगाव बाळापुर या रोडवर टिप्पर क्रं एम एच २७ एक्स ६६७७ हायवा क्रं.एम.एस.२६ एच.डी.२८०५ महसूलच्या पथकाने ताब्यात घेऊन टिप्परला ०१ लाख २० हजार तर हायवाला ०२ लाख रुपये व तसेच ०९ जून रोजी कानखेड शिवारात रेतीचे ०१ ट्रॅक्टर पकडून त्याला ०१ लाख १० हजार रुपयांचा दंड लावला आहे ही कारवाई नायब तहसीलदार प्रशांत थारकर मंडळ अधिकारी शेख अनवर तलाठी मनीष गुंगे रामा रासवे अभिजीत पाटील यांच्या पथकाने केली या पथकाने तालुक्यात ठीकठिकाणी छापे टाकून अवैध गौण खनिज रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे दि.१० जून २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी छापे टाकून  अवैधरित्या रेती माती उत्कलन करणाऱ्या  दोन हायवा एक जेसीबी वाहनावर कारवाई करून जप्त  केली होती त्यानंतर आता महसूलच्या पथकाने छापे टाकत शासनाचा लाखोंचा महसूल वसूल केला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या